
Tiger Shroff Firing Case: केवळ गोळीबार की मोठे नेटवर्क? टायगर श्रॉफ प्रकरणात प्रेयसीच्या एन्ट्रीने उडाली खळबळ!
Tiger Shroff Firing Case: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या तपासात आता एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासाला थेट ‘प्रेमप्रकरणाचा अँगल’ मिळाला असून पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. गोळीबारासाठी वापरलेली पिस्तूल ही मुख्य आरोपीच्या प्रेयसीनेच दिल्लीहून मुंबईत आणल्याचे उघडकीस आल्याने या हायप्रोफाईल केसमध्ये मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी कुणाल याने आपल्या प्रेयसीला दिल्लीहून पिस्तूल आणण्यास सांगितले होते. केवळ पिस्तूल आणायला सांगून तो थांबला नाही, तर प्रेयसी सुरक्षितपणे मुंबईत पोहोचावी म्हणून त्याने तिच्यासोबत अजून एका तरुणीलाही पाठवले होते. या दोन्ही तरुणी मुंबईत आल्यानंतर त्यांची एका रात्री राहण्याची संपूर्ण व्यवस्था आरोपी कुणालनेच केली होती, अशी खळबळजनक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.
मुंबई पोलीस आता या दोन्ही तरुणींचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत. या तरुणींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. हे पिस्तूल दिल्लीत नेमके कुणाकडून मिळाले, ते कुणी पुरवले आणि या संपूर्ण कटामध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा उलगडा होणार आहे. केवळ कौटुंबिक किंवा वैयक्तिक वादातून हा गोळीबार झाला नसून यामागे एखादे मोठे गुन्हेगारी नेटवर्क कार्यरत असण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या नव्या खुलाशामुळे संपूर्ण बॉलिवूडसह पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Ans: तपासात प्रेमप्रकरणाचा अँगल समोर आला असून आरोपी कुणालच्या प्रेयसीनेच दिल्लीहून मुंबईत पिस्तूल आणल्याचे स्पष्ट झाले आहे.
Ans: आरोपी कुणालने आपल्या प्रेयसीसोबत सुरक्षेसाठी आणखी एका तरुणीला मुंबईला पाठवले होते.
Ans: पिस्तूल आणणाऱ्या दोन्ही तरुणींचा पोलीस कसून शोध घेत असून हे पिस्तूल कुठे आणि कुणाकडून मिळाले याचा तपास करत आहेत.