
Tiger Shroff Sells Mumbai Luxury Flat: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
बॉलिवूडचा ॲक्शन हिरो टायगर श्रॉफ सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच जुहूच्या पुष्पा पार्कमध्ये त्याच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक बातमी आली होती. सुदैवाने टायगरला काही झालं नाही, तो सुखरूप आहे, पण त्याचा ड्रायव्हर जखमी झाला होता. पोलिसांनी या प्रकरणात काही लोकांना पकडलं पण आहे. Tiger Shroff Sells Mumbai Luxury Flat:
या घटनेची चर्चा सुरू असतानाच टायगरने आणखी एका मोठ्या कारणाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने मुंबईतली त्याची एक महागडी प्रॉपर्टी विकली आणि त्यातून त्याला चांगला नफा पण झाला आहे.
CRE मॅट्रिक्सच्या रिपोर्टनुसार टायगर श्रॉफने खार पश्चिममधला त्याचा आलिशान फ्लॅट विकला आहे. या फ्लॅटची किंमत 9 कोटी रुपये इतकी आहे. या व्यवहाराची नोंदणी 22 ऑक्टोबर 2026 रोजी झाली.
हा फ्लॅट खार पश्चिममधल्या रुस्त मजी पॅरामाऊंट या प्रसिद्ध सोसायटीमध्ये आहे. नवव्या मजल्यावर असलेला हा फ्लॅट खूपच आलिशान होता.
टायगरने हा फ्लॅट 2018 साली घेतला होता. तेव्हा जुलै 2018 मध्ये त्याने यासाठी 7.61 कोटी रुपये मोजले होते. फ्लॅटचा आकार 1291 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया आहे.
त्याने 7.61 कोटीला घेतलेला फ्लॅट आता 9 कोटीला विकला. जवळपास 1 कोटी 39 लाख रुपयांचा फायदा झाला. इतर खर्च वगळला तरी हा चांगलाच नफा आहे. मुंबईत प्रॉपर्टीचे भाव कसे वाढतात याचंच हे उदाहरण आहे.
टायगर श्रॉफ हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर; इंदूरमधून आणखी एकाला पोलिसांनी केली अटक
विशेष म्हणजे गेल्या एका वर्षात टायगरची ही तिसरी प्रॉपर्टी विक्री आहे. तो त्याच्या प्रॉपर्टी पोर्टफोलिओमध्ये मोठे बदल करतोय.
18 ऑक्टोबरला जुहूमध्ये टायगरच्या गाडीजवळ गोळीबार झाला होता. अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. सुदैवाने टायगर वाचला. या घटनेनंतर 4 दिवसांनीच 22 ऑक्टोबरला फ्लॅट विक्रीची नोंदणी झाली.
त्यामुळे अनेकांना वाटलं की या दोन घटनांचा काही संबंध आहे का? टायगर मुंबई सोडतोय का? किंवा सुरक्षेच्या कारणामुळे त्याने फ्लॅट विकला का? परंतू त्याच्याबाबत कोणतीही अधिकृत पृष्टी करण्यात आली नाही. या दोन्ही घटना वेगवेगळ्या आहेत असंच सांगितलं जातंय. फ्लॅट विक्रीचा प्लॅन आधीपासूनच ठरलेला असण्याची शक्यता आहे.
टायगर श्रॉफकडे मुंबईत अनेक प्रॉपर्टीज आहेत. तो बॉलिवूडमधला सगळ्यात महागडा हिरो असून त्याचे सिनेमे, ब्रँड आणि जाहिरातींमधून तो कोट्यवधी कमावत आहे. तो पैसा तो प्रॉपर्टीत गुंतवतो.
खार पश्चिम हा बॉलिवूड स्टार्सचा आवडता एरिया आहे. इथे अनेक मोठे कलाकार राहतात. टायगरचा हा फ्लॅट पण त्याच एरियात होता. आता हा फ्लॅट कोणी घेतला हे अजून कळलेलं नाही. एकंदरीत गोळीबाराच्या टेन्शननंतर टायगरने त्याच्या कामावर आणि व्यवहारांवर लक्ष केंद्रित केलं आहे. तो लवकरच त्याच्या नवीन सिनेमाच्या शूटिंगला पण सुरुवात करणार आहे.