Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सायली संजीव आणि शशांक केतकर दिसले रोमँटिक अंदाजात, ‘कैरी’ चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज

सायली संजीव आणि शशांक केतकर हे दोन्ही कलाकार प्रेक्षकांना पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. या दोघांचा आगामी चित्रपट 'कैरी' मधील पहिलं वहिलं रोमॅंटिक गाणं प्रदर्शित झालं आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 26, 2025 | 01:13 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • सायली संजीव आणि शशांक दिसले रोमँटिक अंदाजात
  • ‘कैरी’ चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज
  • ‘कैरी’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित
 

उन्हाळ्या आला की आपल्याला लगेचच कैरी ची चव चाखावीशी वाटते. कैरी जशी आंबट गोड असते तसेच नाते आपल्याला नवरा – बायको यांच्यामध्ये पाहायला मिळते. आता यावरच आधारित ‘कैरी’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जो येत्या १२ डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे आणि याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. बरं आता या उत्सुकतेत भर घालायला ‘कैरी’ सिनेमातील ‘नारळी पोफळीच्या बागा’ हे नवकोर रोमँटिक गाणं रिलीज झालं आहे, जे नक्कीच रसिकांना आवडणार आहे. अल्पावधीतच या गाण्याला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. कारण कोकणातील वातावरणात शूट झालेल हे गाणं सध्या आपल्यालाही कोकणची आठवण करून देताना दिसत आहे.

शिंदेंच्या टीकेनंतर कुणाल कामराने RSS वर साधला निशाणा, टी-शर्ट घालून उडवली थट्टा

 

या गाण्याची आणखी एक खासियत म्हणजे या गाण्यात मराठी सिनेसृष्टीतील दोन लोकप्रिय चेहरे दुसऱ्यांदा मोठ्या स्क्रीनवर एकत्र दिसणार आहेत. अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता शशांक केतकर ही जोडी ‘कैरी’ या सिनेमातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. तर ‘कैरी’ या चित्रपटात अभिनेते सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, अरुण नलावडे, सुलभा आर्या हे दिग्गज कलाकारही मुख्य भूमिकेत असल्याचे दिसते आहे. ‘नारळी पोफळीच्या बागा’ या गाण्यात शशांक आणि सायली यांची रोमँटिक केमिस्ट्री दिसत आहे. एकमेकांच्या प्रेमात बेधुंद झालेलं हे जोडपं ते त्यांच्या संसाराची सुरुवात इथवरचा त्यांचा रोमँटिक प्रवास ‘नारळी पोफळीच्या बागा’ या गाण्यात पाहायला मिळत आहे.

‘असुरवन’ चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी नाशिकमध्ये, पंचवटी घाटावर पार पडली गोदा आरती

नॅशनल अवार्ड विनिंग दिग्दर्शक शंतनू गणेश रोडे यांचा रोमँटिक थ्रिलर ‘कैरी’ हा सिनेमा येत्या १२ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटातील ‘नारळी पोफळीच्या बागा’ या रोमँटिक सॉंगने चित्रपटाची उंची आणि उत्सुकता वाढवली आहे. या गाण्याचे गीत मनोहर गोलांबरे यांचे असून संगीताची जबाबदारी निषाद गोलांबरे यांनी सांभाळली आहे. कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात शूट झालेलं ‘नारळी पोफळीच्या बागा’ हे गाणं आणि सायली-शशांकचा रोमँटिक अभिनय साऱ्यांच लक्ष वेधून घेत आहे.

Web Title: Sayali sanjeev and shashank ketkars marathi film kairi will be released in december

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 01:13 PM

Topics:  

  • marathi cinema
  • sayali sanjeev
  • shashank ketkar

संबंधित बातम्या

पद्मविभूषण इलैयाराजा यांच्या संगीताने सजलेला ‘गोंधळ’! चित्रपटातील आणखी एक गाणं प्रदर्शित
1

पद्मविभूषण इलैयाराजा यांच्या संगीताने सजलेला ‘गोंधळ’! चित्रपटातील आणखी एक गाणं प्रदर्शित

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ नाटकाला रसिक प्रेक्षकांची दाद, नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद
2

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ नाटकाला रसिक प्रेक्षकांची दाद, नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद

पुन्हा शाळेच्या आठवणींना मिळणार उजाळा, ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चा टीझर प्रदर्शित
3

पुन्हा शाळेच्या आठवणींना मिळणार उजाळा, ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चा टीझर प्रदर्शित

संगीत देवबाभळी फेम अभिनेत्री पुन्हा विवाहबंधनात अडकणार, 3 महिन्यांपूर्वीच झाला होता घटस्फोट, केळवणाचा Video केला शेअर
4

संगीत देवबाभळी फेम अभिनेत्री पुन्हा विवाहबंधनात अडकणार, 3 महिन्यांपूर्वीच झाला होता घटस्फोट, केळवणाचा Video केला शेअर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.