(फोटो सौजन्य - x अकाउंट)
अभिनेता विकी कौशल आज त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या कारकिर्दीत वेगवेगळ्या भूमिका साकारून स्वतःचे वर्चस्व मिळवले आहे. तसेच आज वाढदिवसानिमित्त विकी कौशलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्याच निमित्ताने, विकी कौशलचे वडील आणि अॅक्शन डायरेक्टर शाम कौशल यांनीही विकी कौशलला खास पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शाम कौशल यांनी एक गोंडस व्हिडिओ शेअर केला आणि विकी कौशलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच चाहते या व्हिडीओला चांगला प्रतिसाद देत आहे.
समांथा प्रभूचा रुमर्ड बॉयफ्रेंड आहे विवाहित, आहे एक मुलगी, पत्नीसोबत झाला नाही घटस्फोट…
वडिलांनी शेअर केलेला प्रेमळ व्हिडीओ
शामने आपल्या इंस्टाग्रामवर आपले कौशल्य आणि विक्की कौशल्याचा एक प्रेमाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विक्की आणि शाम कौशल्य सुमुद्रकिनाऱ्यावर चालताना दिसत आहेत. दोघेही व्हिडिओमध्ये खूप आनंदी आणि हसताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दोन हसरे चेहरे दिसत आहे. तसेच इमोजीसह त्यावर “हॅपी बर्थडे पुत्तर” असे लिहिले आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते देखील व्हिडीओला चांगला प्रतिसाद देत आहे.
वडिलांना विक्कीचा अभिमान आहे
व्हिडिओ शेअर करताना, शाम कौशलने कॅप्शनमध्ये मुलगा विकी कौशलसाठी एक गोंडस नोट देखील लिहिली आहे. कॅप्शनमध्ये शाम कौशल यांनी लिहिले, “वडील हा जगातील सर्वात आनंदी व्यक्ती आहे जो आपल्या मुलाला आयुष्यात पुढे जाताना पाहतो. तुला खूप प्रेम आहे बेटा… तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला माझा मुलगा म्हणून मिळाल्याचा अभिमान आणि धन्यता वाटत आहे. रब दी मेहर बनी रहे. जोर दी झप्पी.” असे लिहून त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
‘छावा’मुळे अभिनेत्याला मिळाली प्रसिद्धी
विकी कौशल त्याच्या आईवडिलांसोबत आणि पत्नी कतरिना कैफसोबत राहतो. कौशल कुटुंब अनेकदा सणांच्या निमित्ताने त्यांचे फोटो शेअर करताना दिसत असतात. कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, विकी कौशल शेवटचा या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. तसेच हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित होता.