Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6 : ‘दुसऱ्याची वाट लावूनच जाईल..’, ‘बिग बॉस’च्या घरात नव्या वादाची ठिणगी! प्रभूने विशालला दिली धमकी

'बिग बॉस मराठी ६'च्या घरात प्रभू आणि विशाल यांच्यामध्ये पुन्हा एकदा वाद झालेला दिसून आला आहे. कलर्स मराठीने 'बिग बॉस'चा नवा प्रोमो रिलीज केला आहे. ज्याला चाहत्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 03, 2026 | 12:18 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘बिग बॉस’च्या घरात नव्या वादाची ठिणगी
  • प्रभूने विशालला दिली धमकी
  • ‘बिग बॉस’च्या नव्या प्रोमोने वेधले लक्ष
 

‘बिग बॉस मराठी ६’चा चौथा आठवडा सुरू झाला असून, घरातील वातावरण पुन्हा एकदा तापलेलं दिसत आहे. पहिल्याच आठवड्यापासून विशाल कोटियन आणि प्रभू शेळके यांच्यातील तणाव प्रेक्षकांच्या लक्षात आला होता. शाब्दिक वाद, टोमणे आणि टास्कदरम्यानची कुरबूर यामुळे हे दोघे कायम चर्चेत राहिले आहेत. दरम्यान एका टास्कमध्ये प्रभूने विशालच्या नावाचं मडकं जोरात पाण्यात फेकल्यानंतर दोघांमधील वाद अधिकच वाढलेला दिसून आले. त्यावेळी संतप्त झालेल्या विशालने, “प्रत्येक नॉमिनेशनमध्ये मी तुलाच नॉमिनेट करेन,” असे म्हणत प्रभूवर तिखट शब्दांचा मारा केला. मात्र नंतर परिस्थिती निवळल्यावर विशालने प्रभूची माफी मागितली होती.

Mardaani 3 ला चौथ्या दिवशी झटका! Border 2 ने दिली जबरदस्त टक्कर; जाणून घ्या Collection

दरम्यान, रितेशलाही प्रभूचा स्वभाव लक्षात येऊ लागला आहे. ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेशने प्रभूला चांगलंच सुनावले, “तो जितका साधा आहे असं दाखवतो, तितका तो नाही,” असे स्पष्ट शब्दांत सुनावले होते. त्यानंतर झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये विशालने पुन्हा एकदा प्रभूला नॉमिनेट केल्याने जुना वाद पुन्हा समोर आला. आणि आता पुन्हा या दोघांमध्ये वाद झालेला दिसून येत आहे.

 

अशातच कलर्स मराठीने नुकताच शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये विशाल आणि प्रभू यांच्यात जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. प्रोमोमध्ये विशाल प्रभूला म्हणताना दिसतो आहे की, “तू माझ्यासाठी एवढा महत्त्वाचा नाही आहेस.” यावर प्रत्युत्तर देताना प्रभू म्हणतो, “तुम्हाला स्वतःचा खूप घमंड आलाय. बॉडी असून काही उपयोग होत नाही.” एवढ्यावरच न थांबता प्रभू, विशालसमोर नाचत त्याला चिडवताना दिसत आहे.

टिक… टिक… टिक 12 : 12 ! Dhurandhar 2 च्या टीझरचा धमाका… निर्मात्यांनी ‘का’ निवडली ही वेळ?

यानंतर विशाल संतापून म्हणतो, “तू नॉमिनेटेड आहेस, मला तुला फुटेज द्यायचं नाही. जा इथून.” यावर प्रभू आणखी आक्रमक होताना दिसत आहे, “डॉन म्हणा मला डॉन… हलक्यात घ्यायचं नाही… दुसऱ्याची वाट लावूनच मी बाहेर जाणार,” असे मोठ्याने ओरडताना प्रभू दिसत आहे. दोघेही एकमेकांवर चढ्या आवाजात बोलताना दिसल्याने घरातील वातावरण अक्षरशः तापल्याचं प्रोमोमध्ये स्पष्ट होतं आहे.

हा प्रोमो शेअर करताना कलर्स मराठीने कॅप्शनमध्ये, “डॉन आणि विशालच्या भांडणामुळे बिग बॉसच्या घरात फुल फायरी वातावरण” असे म्हटले आहे. त्यामुळे आगामी भागांमध्ये हा वाद कोणत्या टोकाला जाईल, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, या प्रोमोवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी, “हा डॉन आणि रोशन संधी मिळाली की सिम्पथी घेतात,” अशी टीका केली आहे, तर काहींनी, “जाणूनबुजून पंगा घेतात आणि फुटेज नको म्हणून ओरडतात,” अशा कमेंट्स केल्या आहेत.

Web Title: Bigg boss marathi 6 prabhu shelke vishal kotian fight watch promo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • entertainment
  • Marathi News

संबंधित बातम्या

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान
1

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
2

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
3

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
4

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.