(फोटो सौजन्य - एक्स अकाउंट)
शनिवारी (८ मार्च) मुंबईत झालेल्या लोलापालूझा २०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय पॉप गायक शॉन मेंडिसने भारतात पहिल्यांदाच सादरीकरण करून स्टेजवर धुमाकूळ घातला. कॅनेडियन गायक ‘सिचेस’ आणि ‘सेनोरिता’ ही हिट गाणी गाण्यासाठी हा गायक खूप प्रसिद्ध आहे. त्याच्या सादरीकरणादरम्यान त्याने असे काही केले ज्याने भारतीय प्रेक्षकांची मने जिंकली आहे. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच त्याला भरभरून प्रतिसाद देखील मिळत आहे.
‘तू खरीखुरी परी आहेस माधुरी…’ तुझ्या सौंदर्याने तर सोनेरी लखलखाटीला पण धोभिपछाड दिला
व्हिडिओ होतोय व्हायरल
आंतरराष्ट्रीय पॉप गायक शॉन मेंडिसने त्याच्या लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीची जर्सी घातली होती. हे पाहून भारतीय चाहत्यांनी त्याचे खूप कौतुक केले आहे. विराटची जर्सी घालून शॉनच्या कामगिरीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. सोशल मीडियावरील विराटचे चाहते त्याच्या या कृतीचे कौतुक करत आहेत. हा कार्यक्रम जागतिक संगीत महोत्सव लोल्लापालूझाचा एक भाग होता, ज्यामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय आणि भारतीय कलाकारांनीही आपली प्रतिभा दाखवली. शॉनने त्याच्या हिट गाण्यांचा उत्कृष्ट सादरीकरण केले, त्याने या कार्यक्रमादरम्यान अद्भुत गायन आणि उत्तम ऊर्जा दाखवली.
SHAWN MENDES is wearing Virat Kohli’s Jersey 😭😭 y’all this is so personal to me 😫😫😫
my two Worlds collide 😫😫😫 pic.twitter.com/SckDhovi6D
— Ash (@pr_ash15) March 8, 2025
मुंबईच्या रस्त्यांवर देखील सादरीकरण केले
यापूर्वी, शॉन मेंडिसला मुंबईच्या रस्त्यांवर देखील पाहिले गेले होते, जिथे त्याने त्याच्या चाहत्यांसाठी एक परफॉर्मन्स सादर केला होता. ७ मार्च रोजी मुंबईत आलेल्या या आंतरराष्ट्रीय पॉप स्टारने कुलाबा कॉजवे येथे आपल्या चाहत्यांशी संवाद साधला आणि नंतर त्यांचे ‘सेनोरिता’ हे हिट गाणे गायले. या लाइव्ह कॉन्सर्टदरम्यानचे सगळे व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत. तसेच त्याने विराटच्या नावाची जर्सी घालून चाहत्यांचे मन जिंकले आहे.
संगीत महोत्सवात अनेक दिग्गज दिसले
याशिवाय, शॉनने शनिवारी (८ मार्च) मुंबईतील संगीत संस्था ‘द साउंड स्पेस’च्या विद्यार्थ्यांसाठी एका खाजगी संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मुंबईत तिसऱ्यांदा लोलापालूझा आयोजित करण्यात आला आहे. शॉनसोबत, या संगीत महोत्सवात ग्रीन डे, हनुमानकाइंड, तलविंदर, रफ्तार, लुई टॉमलिन्सन, ग्लास अॅनिमल्स, लिसा मिश्रा आणि इतर अनेक आंतरराष्ट्रीय कलाकार देखील सादरीकरण करताना दिसले आहेत.