
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सलमान खानचा रिॲलिटी शो “बिग बॉस १९” अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. शोचा ग्रँड फिनाले ७ डिसेंबर रोजी होणार आहे. या दिवशी, एक स्पर्धक “बिग बॉस १९” ट्रॉफी उचलताना दिसेल. मालती चहरच्या अलिकडेच बाहेर पडल्यानंतर, टॉप पाच फायनलिस्ट मिळाले आहेत.बिग बॉस हा भारतातील सर्वात मोठ्या रिअॅलिटी शोपैकी एक आहे आणि टॉप पाच फायनलिस्टमध्ये अमाल मलिक, फरहाना भट, प्रणीत मोरे, तान्या मित्तल आणि टिकट टू फिनालेचा विजेता गौरव खन्ना आहेत, ज्यांनी प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले आहे. आता या शोमध्ये कोणी कॅप्टन नसणार आहे. ना आता कोणते टास्क खेळवले जाणार आहे. या पाच स्पर्धकांमध्ये केवळ प्रेक्षकांच्या मतांवरून स्पर्धा होणार. प्रेक्षकांच्या मतांवरून ठरेल की, यंदाच्या पर्वाची ट्रॉफी कोण घेऊन जाणार. यादरम्यान अनेक सेलिब्रिटी त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा देत आहेत. अलिकडेच बॉलिवूड अभिनेत्री आणि बिग बॉस 18 मधील वादग्रस्त स्पर्धक शिल्पा शिरोडकर हिने एक ट्वीट शेअर केले आहे. या ट्वीटद्वारे शिल्पाने प्रणित मोरेला आपला पाठिंबा दर्शवला आहे. तिच्या या विधानावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
प्राईम व्हिडीओ घेऊन येत आहे ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ चा शेवटचा सीझन, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
शिल्पाने शेअर केलेल्या ट्वीवीटमध्ये असे म्हटले की, ”ठीक आहे, हे मला माहित आहे की प्रत्येकाचा आपापला आवडता स्पर्धक असतो. पण माझ्यासाठी फक्त एकच आवडता आहे — प्रणित मोरे. तो एकमेव व्यक्ती आहे ज्याने कुठेही दिखावा केला नाही. तो सुरुवातीपासून खरा राहिला. आपण सर्वजण अशाच लोकांना पसंत करतो, जे स्वतःची खरी ओळख दाखवतात,आपण सर्वजण अशा लोकांशीच जोडले जातो, जे स्वत:ची खरी बाजू दाखतात, आणि तो तसेच वागला, तो खरा हिरो आहे. जर तुम्हीलाही हे लक्षात आले असेल, तर माझ्यासोबत उभे राहा आणि प्रणितला आताच वोट करा.चला अशा प्रकारची प्रामाणिकता साजरी करूया. चला त्याला #BB19 जिंकवूया..#VoteForPranit.’
Okay, look, I know everyone has their favorites, but for me, there is only one choice @Rj_pranit. I genuinely feel like he’s the only one who didn’t put on a front, he was just real. We all connect with people who are unapologetically themselves, and that’s exactly what he is A… — Shilpa shirodkar (@Shilpashirodkr) December 4, 2025
शिल्पाने शेअर केलेली ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. अनेक युजरने कमेंट केली की, ‘कारण तो मराठी आहे म्हणून… समजले.. मला माहितेय प्रत्येकाचे आवडते स्पर्धक वेगवेगळ्या संबंधांवर आधारित असतात. परंतु मी पात्र विजेत्यावर लक्ष केंद्रित करतो आहे. मला प्रणित मोरे आवडत नाही असे नाही. , तो निश्चितच खरा आहे आणि त्याने उत्तम कंटेंट दिला आहे, परंतु हा खेळ केवळ प्रादेशिक निष्ठेबद्दल नाही. दुसऱ्याने अशी कमेंट केले की, ”तुमचा मराठी कोटा इथे आणू नका”. अश्या अनेक कमेंट्स येत आहेत. तर काहींनी यावरून सुनावले आहे की प्रणितमुळेच अभिषेक बजाजला बाहेर जावे लागले आहे.