Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mismatched Season 4: ‘मिसमॅच्ड’चा शेवटचा अध्याय सुरू; चौथ्या आणि अंतिम सीझनच्या शूटिंगदरम्यान ऋषी-डिंपल झाले भावूक

Mismatched Season 4: नेटफ्लिक्सच्या 'मिसमॅच्ड'च्या चौथ्या आणि अंतिम सीझनच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. प्राजक्ता कोळी आणि रोहित सराफ यांनी भावनिक प्रतिक्रिया देत चाहत्यांची उत्सुकता वाढवली.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 08, 2026 | 09:55 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय रोमँटिक ड्रामा मालिका ‘मिसमॅच्ड’ च्या चौथ्या आणि अंतिम सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर या बहुचर्चित सीझनच्या शूटिंगला सुरुवात झाली असून, अभिनेत्री प्राजक्ता कोळी आणि अभिनेता रोहित सराफ पुन्हा एकदा डिंपल आणि ऋषीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नेटफ्लिक्सने सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर करत ही घोषणा केली आहे.

इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत नेटफ्लिक्सने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. यासोबतच स्पष्ट करण्यात आले की, चौथा सीझन हा ‘मिसमॅच्ड’चा अंतिम अध्याय असणार आहे. त्यामुळे डिंपल आणि ऋषीच्या प्रेमकथेचा शेवट कसा होणार, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढली आहे.

नवीन सीझनची कथा तिसऱ्या सीझननंतर पुढे सरकणार आहे. तिसऱ्या भागाच्या शेवटी डिंपल आहुजा आणि ऋषी सिंग शेखावत यांनी करिअरला प्राधान्य देत आपला साखरपुडा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यांच्या नात्याचा पुढचा प्रवास अंतिम सीझनमध्ये उलगडणार आहे.

संध्या मेनन यांच्या ‘When Dimple Met Rishi’ या नोवेल वर आधारित ‘मिसमॅच्ड’ सिरीजचा पहिला सीझन २० नोव्हेंबर २०२० रोजी प्रदर्शित झाला होता. आकर्ष खुराना आणि निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित या मालिकेने तरुण प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

चौथ्या सीझनमध्ये प्राजक्ता कोळी आणि रोहित सराफ यांच्यासोबत रणविजय सिंग, विद्या मालवदे, विहान समत, देवयानी शौरी, प्रिया बॅनर्जी, तारुक रैना, मुस्कान जाफरी, आकर्ष खुराना आणि एहसास चन्ना यांच्याही महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत. निर्मात्यांच्या मते, अंतिम सीझनमध्ये जुन्या आठवणींसोबत अनेक नवीन वळणे आणि आश्चर्यकारक क्षण प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

शूटिंगला सुरुवात झाल्यानंतर प्राजक्ता कोळी भावूक झाली. ती म्हणाली, “‘मिसमॅच्ड’च्या अंतिम सीझनसाठी सेटवर परत येणं खूप भावनिक आहे. डिंपल माझ्या प्रवासाचा महत्त्वाचा भाग राहिली आहे. तिच्या कथेचा शेवट प्रेक्षकांसमोर मांडण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. आमच्या ‘पग्लू’साठी आम्ही जे काही तयार करत आहोत, ते प्रेक्षकांना दाखवण्यासाठी मी उत्सुक आहे.”


Akanksha Chamola: गौरव खन्नासोबतच्या घटस्फोटानंतर आकांक्षा चमोला दुसरं लग्न करणार? भविष्यातील योजनांबाबत केला मोठा खुलासा

रोहित सराफनेही या प्रवासाबद्दल भावना व्यक्त करत म्हटले, “‘मिसमॅच्ड’ने मला आयुष्यातील काही सुंदर आठवणी दिल्या आहेत. अंतिम सीझनसाठी पुन्हा या टीमसोबत काम करणं आणि ऋषीच्या भूमिकेत परतणं माझ्यासाठी खूप खास आणि जादुई अनुभव आहे.”

चौथा आणि अंतिम सीझन डिंपल आणि ऋषीच्या प्रेमकथेचा शेवट कसा होणार, याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

‘मासिक पाळी सुरू होती, वॉशरूमलाही जाता आलं नाही’, ९ तास वाहतूक कोंडीत अडकली मराठी अभिनेत्री; सांगितला थरारक अनुभव

Web Title: Shooting for the final season of mismatched begins rishi and dimple get emotional prajakta koli and rohit saraf share heartfelt posts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 09:55 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Prajakta Koli
  • Rohit Saraf
  • Web Series

संबंधित बातम्या

Marathi Movie : नोटांचा पाऊस, पैशांच्या मागे धावणारी माणसं अन्..; ‘अफरातफरी’चा मोशन पोस्टर पाहिलात का?
1

Marathi Movie : नोटांचा पाऊस, पैशांच्या मागे धावणारी माणसं अन्..; ‘अफरातफरी’चा मोशन पोस्टर पाहिलात का?

Antara Banerjee: ‘आज मी आहे, उद्या कोणीतरी दुसरं..’,चुकीचा फोटो वापरल्याने अंतरा बॅनर्जींचा संताप
2

Antara Banerjee: ‘आज मी आहे, उद्या कोणीतरी दुसरं..’,चुकीचा फोटो वापरल्याने अंतरा बॅनर्जींचा संताप

Jay Jay Swami Samarth: स्वामींची शिवनाथ-राधाला अंतिम चेतावणी; दिला ३ दिवसांचा अवधी, अक्कलकोटमध्ये मोठा ट्विस्ट
3

Jay Jay Swami Samarth: स्वामींची शिवनाथ-राधाला अंतिम चेतावणी; दिला ३ दिवसांचा अवधी, अक्कलकोटमध्ये मोठा ट्विस्ट

The Revolutionaries: ‘द रेव्होल्यूशनरीज’चं ‘जय दुर्गा’ भक्तिगीत रिलीज; माँ दुर्गेच्या दिव्य शक्तीचा जयघोष
4

The Revolutionaries: ‘द रेव्होल्यूशनरीज’चं ‘जय दुर्गा’ भक्तिगीत रिलीज; माँ दुर्गेच्या दिव्य शक्तीचा जयघोष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.