Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Duniya Ki Thain Thain: एका विश्वासघाताने उद्ध्वस्त झालं आयुष्य; ‘विकी भैय्या’च्या सूडाची कहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Duniya Ki Thain Thain: ‘दुनिया की ठयां ठयां’ या MX Original सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ऋषभ जयस्वाल आणि दीपाली शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही सीरिज २२ ऑक्टोबरपासून मोफत पाहता येणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 19, 2026 | 04:10 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Duniya Ki Thain Thain:  प्रेम, विश्वासघात आणि सूडाच्या भावनेतून आयुष्य कसं बदलतं, याची थरारक कहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्राइम व्हिडीओच्या आगामी एमएक्स ओरिजिनल ‘दुनिया की ठयां ठयां’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. एका तरुण नेमबाजाच्या ऑलिम्पिकच्या स्वप्नापासून सुरू होणारा प्रवास विश्वासघातामुळे सूडाच्या आगीत कसा बदलतो, याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. ऋषभ जयस्वाल आणि दीपाली शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही सीरिज २२ ऑक्टोबर २०२६ पासून प्राइम व्हिडीओ आणि एमएक्स प्लेयरवर विनामूल्य स्ट्रीम होणार आहे.

नेमबाज विकास बनतो ‘विकी भैय्या’; ट्रेलरमध्ये दिसला बदललेला चेहरा

‘दुनिया की ठयां ठयां’ची कथा राजकीयदृष्ट्या तणावपूर्ण असलेल्या शक्तीपूर शहरात घडते. विकास कुमार (ऋषभ जयस्वाल) हा एक महत्त्वाकांक्षी तरुण नेमबाज असतो. त्याचं ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचं स्वप्न असतं. मात्र, त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या एका विश्वासघातामुळे त्याचं संपूर्ण जग बदलून जातं.

आपलं प्रेम असलेल्या वैष्णवी चतुर्वेदीला (दीपाली शर्मा) वाचवण्यासाठी विकास सर्वस्व पणाला लावतो. वैष्णवी ही एका शक्तिशाली आमदाराची मुलगी असते. मात्र, जेव्हा ती न्यायालयात विकासच्या विरोधात साक्ष देते, तेव्हा त्याचा प्रेमावरचा आणि विश्वासावरचा भरवसा ढासळतो. यानंतर विकासच्या आयुष्याला वेगळं वळण मिळतं आणि तो ‘विकी भैय्या’ बनतो.

 

अनेक वर्षांनंतर पुन्हा आमनेसामने; आता वैष्णवी पोलीस अधिकारी

काळ पुढे सरकतो आणि विकास व वैष्णवी पुन्हा एकदा आमनेसामने येतात. मात्र, आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली असते. वैष्णवी पोलीस अधीक्षक पदावर कार्यरत असते आणि विकी भैय्याला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवण्यात येते.

एकेकाळी प्रेमात असलेली ही जोडी आता तुटलेल्या विश्वासाचा भार, भूतकाळातील जखमा आणि सूडाच्या भावनेशी सामना करताना दिसते. न्याय मिळवण्याची इच्छा आणि बदला घेण्याची आस यांच्यातील संघर्ष या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे ट्रेलरमधूनच या कथेबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

ऋषभ जयस्वाल आणि दीपाली शर्मा काय म्हणाले?

विकास अर्थात विकी भैय्याची भूमिका साकारणारा ऋषभ जयस्वाल या व्यक्तिरेखेबद्दल सांगताना म्हणाला की, सुरुवातीला स्पष्ट ध्येय असलेला, कुटुंबावर विश्वास ठेवणारा आणि प्रेमावर श्रद्धा असलेला तरुण पुढे कसा बदलतो, हा या भूमिकेतील सर्वात महत्त्वाचा पैलू होता. राग, मोहभंग आणि भूतकाळाला सामोरं जाण्याची गरज यांतून विकासच्या व्यक्तिमत्त्वात होणारे बदल साकारणं त्याच्यासाठी भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक होतं.

वैष्णवीची भूमिका साकारणाऱ्या दीपाली शर्माच्या मते, वैष्णवी ही सामर्थ्य आणि विशेषाधिकारांच्या वातावरणात वाढलेली असली, तरी तिचा प्रवास सरळ नाही. विकाससोबतच्या नात्यामुळे तिच्या आयुष्यात अनेक गुंतागुंतीच्या भावना आणि निर्णय येतात. एकीकडे भूतकाळातील नातं, तर दुसरीकडे पोलीस अधिकारी म्हणून असलेली जबाबदारी, या दोन्ही गोष्टींमधील संघर्ष तिच्या व्यक्तिरेखेला महत्त्वाचा बनवतो.

प्रेम, विश्वासघात आणि सूडाची कथा

या सीरिजची संकल्पना आणि निर्मिती सचिन पांडे यांनी केली आहे. सुमित चावला यांनी दिग्दर्शन, तर नितीन केसवानी यांनी लेखन केलं आहे. बॉम्बे शो स्टुडिओजच्या बॅनरखाली या सीरिजची निर्मिती करण्यात आली आहे.

निर्माते सचिन पांडे यांच्या मते, विश्वासघाताचा एक क्षण एखाद्या व्यक्तीचं आयुष्य कसं बदलू शकतो आणि त्यानंतर घेतलेले निर्णय व्यक्तिमत्त्वाला कसा आकार देतात, हा या कथेचा केंद्रबिंदू आहे. प्रेमातील गुंतागुंत, तुटलेल्या विश्वासाचं ओझं आणि न्याय मिळवणं व सूड घेणं यांमधील सीमारेषा या कथेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Riteish Deshmukh: मराठी-बॉलिवूड गाजवल्यानंतर रितेश देशमुखची साऊथमध्ये एन्ट्री, ‘RAPO23’मध्ये दिसणार नव्या अवतारात!

कधी आणि कुठे पाहता येणार ‘दुनिया की ठयां ठयां’?

‘दुनिया की ठयां ठयां’ ही सीरिज २२ ऑक्टोबर २०२६ पासून प्राइम व्हिडीओ आणि एमएक्स प्लेयरवर विनामूल्य स्ट्रीम होणार आहे. प्रेम, राजकारण, विश्वासघात आणि सूड यांचा संगम असलेल्या या कथेत विकास आणि वैष्णवीच्या आयुष्याला कोणतं वळण मिळणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Chikeezing Marathi Movie: लाल माती, शाळेची धमाल अन् भावंडांचं प्रेम! ‘चिकीझिंग’च्या गाण्यातून उलगडणार बालपणाचं विश्व

Web Title: Duniya ki thain thain trailer release free streaming ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • entertainment
  • Web Series

संबंधित बातम्या

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणामुळे खळबळ; सलमान खानसोबत काम केलेल्या आणखी कोणत्या कलाकारांना धोका?
1

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणामुळे खळबळ; सलमान खानसोबत काम केलेल्या आणखी कोणत्या कलाकारांना धोका?

Chikeezing Marathi Movie: लाल माती, शाळेची धमाल अन् भावंडांचं प्रेम! ‘चिकीझिंग’च्या गाण्यातून उलगडणार बालपणाचं विश्व
2

Chikeezing Marathi Movie: लाल माती, शाळेची धमाल अन् भावंडांचं प्रेम! ‘चिकीझिंग’च्या गाण्यातून उलगडणार बालपणाचं विश्व

Riteish Deshmukh: मराठी-बॉलिवूड गाजवल्यानंतर रितेश देशमुखची साऊथमध्ये एन्ट्री, ‘RAPO23’मध्ये दिसणार नव्या अवतारात!
3

Riteish Deshmukh: मराठी-बॉलिवूड गाजवल्यानंतर रितेश देशमुखची साऊथमध्ये एन्ट्री, ‘RAPO23’मध्ये दिसणार नव्या अवतारात!

Paach Futacha Bachchan: ‘पाच फुटाचा बच्चन’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी; महाराष्ट्रात वाढली चर्चा, आता अमेरिकेतही होणार प्रदर्शित
4

Paach Futacha Bachchan: ‘पाच फुटाचा बच्चन’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी; महाराष्ट्रात वाढली चर्चा, आता अमेरिकेतही होणार प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.