(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
लोकप्रिय गायक आणि रॅपर बादशाह त्याच्या गाण्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. चाहत्यांना त्याची सगळी गाणी आवडतात. परंतु आता बादशाह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण त्याने नियम मोडून स्वतःची कार चुकीच्या दिशेने कार चालवल्यामुळे पोलिसांकडे दंड भरावा लागला आहे. बादशाह ज्या वाहनातून आला होता, त्या वाहनाचेही चलन बजावण्यात आले आहे. रॅपरच्या थारची वाहने चुकीच्या बाजूने धावत असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुग्राम पोलिसांनी ज्या वाहनासाठी चलन जारी केले आहे ते बादशाहच्या नावावर नाही, तो नुकताच या वाहनातून कार्यक्रमाला पोहोचला होता. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.
VIDEO | “Yesterday, Gurugram Police had received information regarding wrong side driving by three vehicles on Sohna Road, where a music event was being held. As per the information gathered on the basis of the number plate of one of the vehicles, Gurugram Police issued a fine of… pic.twitter.com/CMsWd3BSMA
— Press Trust of India (@PTI_News) December 17, 2024
गुरुग्राम पोलिस जनसंपर्क अधिकारी संदीप कुमार यांनी सांगितले की, ‘गुरुग्राम पोलिसांना सोहना रोडवर तीन वाहने चुकीच्या बाजूने जात असल्याची माहिती मिळाली होती, जिथे संगीत मैफल आयोजित केली जात होती. या तीन वाहनांपैकी पोलिसांनी एका वाहनाला चुकीच्या बाजूने चालवल्याबद्दल चलन बजावले आहे. या प्रकरणाच्या तपासात हा ताफा गायक बादशाहचा असल्याचे समोर आले आहे. इतर दोन वाहनांवर तात्पुरते नोंदणी क्रमांक होते, पुढील तपास सुरू आहे.’ पोलिसांनी सांगितले आहे.
करण औजलाच्या कॉन्सर्टमध्ये बादशाहा पोहोचला होता
बादशाहने अलीकडेच गुरुग्राममध्ये गायक आणि रॅपर करण औजला यांच्या एका कॉन्सर्टमध्ये हजेरी लावली होती. बादशाह काळ्या थार मध्ये मैफिलीत सहभागी होण्यासाठी पोहचला होता आणि त्याच्या इतरही कारचा समावेश होता. गुरुग्राम पोलिसांनी बादशाह बसलेल्या कारसाठी 15,500 रुपयांचे चलन जारी केले आहे. इतर थार वाहनांची ओळख पटवली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाबाबत डीसीपी ट्रॅफिक वीरेंद्र विज सांगतात, ‘बादशाहची कार चुकीच्या बाजूने चालवल्याबद्दल आम्ही चलन काढले आहे, कार बादशाहच्या नावावर नसली तरी तो त्यात उपस्थित होता.’ बादशाह ज्या थारमध्ये प्रवास करत होता, तो केवळ चुकीच्या बाजूने प्रवास करत नव्हता तर वायू प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करत होता आणि धोकादायकपणे वाहन चालवत होता, असे सांगण्यात येत आहे.
संजीदा शेखने ‘हीरामंडी २’ बाबत केला मोठा खुलासा, संजय लीला भन्साळी मालिकेचा कसा असेल दुसरा भाग?
बादशाह ‘इंडियन आयडॉल 15’ ला जज करत आहे.
15 डिसेंबरला गुरुग्राममध्ये करण औजलाचा कॉन्सर्ट झाला होता आणि त्यात बादशाहही सहभागी झाला होता. दोन रॅपर्सना एकत्र पाहिल्यानंतर चाहते खूप उत्साहित झाले. उल्लेखनीय आहे की आजकाल बादशाह टीव्हीच्या लोकप्रिय सिंगिंग रिॲलिटी शो ‘इंडियन आयडॉल 15’ मध्ये विशाल ददलानी आणि श्रेया घोषाल यांच्यासोबत जज म्हणून दिसत आहे.