(फोटो सौजन्य - x अकाउंट)
चित्रपटगृहांमध्ये अनेक चित्रपट येतात आणि जातात, काही चित्रपटांची चांगली कमाई होते तर काही कमाईच्या बाबत मागे राहतात. सध्या आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ आणि धनुषचा ‘कुबेर’ हे चित्रपटगृहांमध्ये आपली जादू दाखवत आहेत. दोन्ही चित्रपटांनी त्यांच्या प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच तिकीट खिडकीवर आपली पकड कायम ठेवली आहे. दरम्यान, दोन्ही चित्रपटांच्या कमाईचे ताजे आकडे समोर आले आहेत. या चित्रपटांनी किती कमाई केली आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.
‘सितारे जमीन पर’ चित्रपटाबद्दल
Sacnilk.com च्या ताज्या अहवालानुसार, ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाने त्याच्या प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी ७.२५ कोटी रुपये कमावले आहेत. दुसरीकडे, धनुषचा ‘कुबेर’ चित्रपटाने त्याच्या प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी ४.०० कोटी रुपये कमावले आहेत. या दोन्ही चित्रपटांचे हे आकडे अद्याप प्राथमिक आणि अंदाजे आहेत आणि त्यात बदल होऊ शकतात. तरीही या दोन्ही चित्रपटाने आपली पकड कायम ठेवली आहे.
एल्विश यादव आणि करण कुंद्रा ठरले ‘Laughter Chefs 2’ चे विजेते! ट्रॉफीसोबत फोटो व्हायरल
‘कुबेर’ चित्रपटाची कमाई
याशिवाय, जर आपण या दोन्ही चित्रपटांच्या एकूण कमाईबद्दल बोललो तर, ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाने फक्त सहा दिवसांत ८२.४० कोटींची कमाई केली आहे. दुसरीकडे, धनुषच्या ‘कुबेर’ चित्रपटाने आतापर्यंत ६५.२५ कोटींची कमाई केली आहे. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे आणि दोन्हीही प्रचंड कमाई करण्यात गुंतले आहेत.
गेल्या पाच दिवसाचे कलेक्शन
‘सितारे जमीन पर’ चित्रपटाच्या गेल्या पाच दिवसांतील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी १०.७ कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी २०.२ कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी २७.२५ कोटी रुपये, चौथ्या दिवशी ८.५ कोटी रुपये आणि पाचव्या दिवशी ८.५ कोटी रुपये कमावले आहे. या चित्रपटाने सिनेमागृहात चांगली कमाई केली आहे.
अखेर अमिताभ बच्चन यांच्या व्हॉइस कॉलर ट्यूनवर बंदी; ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
बॉक्स ऑफिसवर मेगा टक्कर होणार आहे
दुसरीकडे, ‘कुबेर’ चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी १४.७५ कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी १६.५ कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी १७.३५ कोटी रुपये, चौथ्या दिवशी ६.८ कोटी रुपये आणि पाचव्या दिवशी ५.८५ कोटी रुपये कमावले. याशिवाय, बॉक्स ऑफिसबद्दल बोलायचे झाले तर, तिकीट खिडकीवर सुपर टक्कर होणार आहे. २७ जून रोजी तिकीट खिडकीवर अनेक चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहेत. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी काय कमाल करतात हे पाहणे मनोरंजक असेल.