Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Punha Ekda Saade Maade Teen: अखेर कुरळे ब्रदर्सच्या आयुष्यात आली ‘ती’? ‘नो लेडीज, नो मॅरेज’ चा मोडला नियम; Teaser रिलीज

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ चित्रपटाचा टीझर अखेर रीलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाची प्रतीक्षा चाहते अनेक वर्षांपासून करत आहेत. आणि अखेर आता चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 05, 2026 | 04:54 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • अखेर कुरळे ब्रदर्सच्या आयुष्यात आली ‘ती’?
  • ‘नो लेडीज, नो मॅरेज’ चा मोडला नियम
  • चित्रपटाचा टीझर लाँच
 

‘साडे माडे तीन’ या चित्रपटाचा सीक्वेल आता अखेर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना पुन्हा ती मज्जा ते विनोद अनुभवयाला मिळणार असून, कुरळे ब्रदर्सना भेटता येणार आहे. तसेच नुकतेच या चित्रपटाचे टीझर देखील रिलीज करण्यात आले आहे. ‘नो लेडीज, नो मॅरेज’ कुरळे ब्रदर्सचा हा नियम मोडल्याचे सिनेमामध्ये दिसणार आहे.

कुरळे ब्रदर्ससाठी आयुष्य म्हणजे नियम, शिस्त आणि एक ठाम तत्त्व – ‘नो लेडीज, नो मॅरेज’. ज्यांच्या आयुष्यात स्त्रियांना अजिबात स्थान नाही त्यांच्या आयुष्यात जर एका स्त्रीची एन्ट्री झाली तर? ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये असंच काहीस पाहायला मिळालेलं आहे. रतन, मदन, चंदन आणि बबन यांच्या आयुष्यात कामिनीची एन्ट्री झालेली दिसून आली आहे. यांच्या आयुष्यात कामिनीच्या येण्याने काय घडेल, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. कामिनीच्या येण्याने उडणारी तारांबळ, गोंधळ आणि विनोद यांची धमाल झलक टीझरमध्ये पाहायला मिळाली आहे.

भारतीय मनोरंजन उद्योगात मोठा टर्निंग पॉइंट: युनिव्हर्सल म्युझिक इंडियाची एक्सेल एंटरटेनमेंटमध्ये एंट्री

कामिनीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरू या चित्रपटातून कुरळे ब्रदर्सच्या गँगमध्ये सामील होताना दिसणार आहे. शिस्तप्रिय भावंडांमध्ये बिनधास्त कामिनीची एन्ट्री होणं म्हणजे डबल गोंधळ, डबल विनोद यासगळ्यांचा कल्ला पाहायला मिळणार आहे. कठोर स्वभावाचा रतन, विनोदी मदन, निरागस स्वभाव असलेला चंदन या भिन्न स्वभावांच्या भावांसोबत आणि खट्याळ बबन बरोबर तिची केमिस्ट्री कशी जमेल? हे प्रेक्षकांना चित्रपटामध्येच पाहायला मिळणार आहे.

 

रिंकू राजगुरू म्हणाली, “ ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’सारख्या मोठ्या आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान असलेल्या चित्रपटाच्या सीक्वेलचा भाग होणं हे माझ्यासाठी खूप खास आहे. अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक अंकुश चौधरी यांच्यासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळालेलं आहे.”

सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रस्तुत, उषा काकडे प्रॉडक्शन्स, ईओडी. मीडिया उदाहरणार्थ निर्मित आणि अमेय विनोद खोपकर पिक्चर्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरी यांनी केले आहे. तसेच उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मोहसिन खान, यशराज टिळेकर, सौरभ ललवाणी आणि धनविक एंटरटेनमेंट सहनिर्माते असून स्मिथ पीटर तेलगोटे सहायक निर्माता आहेत.

Happy Patel: खतरनाक जासूस’मध्ये प्रेम आणि गंमतीचा संगम, चित्रपटातील ‘चांटा तेरा’ गाणं रिलीज

अंकुश चौधरी यांची कथा, संदीप दंडवते यांची पटकथा आणि संवाद लेखन केले आहे. तसेच या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संकेत पाठक, संजय नार्वेकर आणि समृद्धी केळकर यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार संजय जाधव यांनी केले आहे. येत्या ३० जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जो पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

Web Title: Punha ekda sade made teen teaser out ashok saraf makarand anaspure bharat jadhav return

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • Marathi News

संबंधित बातम्या

Nilesh Naik: एडिटरच्या खुर्चीतून दिग्दर्शनाच्या कॅमेऱ्यामागे; निलेश नाईक यांचा ‘द्विधा’मधून नवा प्रवास
1

Nilesh Naik: एडिटरच्या खुर्चीतून दिग्दर्शनाच्या कॅमेऱ्यामागे; निलेश नाईक यांचा ‘द्विधा’मधून नवा प्रवास

GTMC Nanded Bharti 2026: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी, ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापनमध्ये एकूण ‘इतक्या’ पदासांठी विशेष भरती
2

GTMC Nanded Bharti 2026: बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी, ग्रामीण तांत्रिक आणि व्यवस्थापनमध्ये एकूण ‘इतक्या’ पदासांठी विशेष भरती

Chandrapur News: चंद्रपुरातील ‘बोडी’ होतायत नामशेष! पारंपरिक जलसंधारण व्यवस्थेवर मोठं संकट ; पुनरुज्जीवनाची गरज
3

Chandrapur News: चंद्रपुरातील ‘बोडी’ होतायत नामशेष! पारंपरिक जलसंधारण व्यवस्थेवर मोठं संकट ; पुनरुज्जीवनाची गरज

Monika Dabade Mangalagauri Look: ‘ठरलं तर मग’ फेम मोनिका दबडेचा जांभळ्या नऊवारीत मराठमोळा अंदाज, चाहत्यांचं लक्ष वेधलं
4

Monika Dabade Mangalagauri Look: ‘ठरलं तर मग’ फेम मोनिका दबडेचा जांभळ्या नऊवारीत मराठमोळा अंदाज, चाहत्यांचं लक्ष वेधलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.