(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलीवूड सुपरस्टार आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाला आहे. चाहत्यांना या चित्रपटाचा ट्रेलर खूप आवडला. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनालाही स्पर्श करत आहे, हे त्यांच्या प्रतिक्रियांवरून स्पष्ट होते. आतापर्यंत आलेल्या सर्व प्रतिक्रियांमध्ये प्रेक्षकांनी आमिर खानच्या चित्रपटाचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर, व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी म्हटले आहे की ‘सितारे जमीन पर’ हा एक खूप चांगला चित्रपट आहे. आमिर खानने अखेर करून दाखवला आहे. असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे.
‘सितारे जमीन पर’ला सकारात्मक प्रतिक्रिया
‘आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनीही सुपरस्टारच्या चित्रपटाचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, ‘मला हा चित्रपट खूप आवडला. बदलत्या काळासोबत आपण बदलले पाहिजे.’ असे त्यांनी म्हटले आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘खरा चॅम्पियन… तुम्ही हसाल, रडाल आणि अभिमान देखील वाटेल. हे एक रूपांतर आहे. आमिर खानने ते करून दाखवले आहे.’ असे त्यांनी लिहिले. दुसऱ्या एका युजरने लिहिले, ‘सीक्रेट सुपरस्टार नंतर, अखेर आमिर खान परत आला आहे. कृपया असे आणखी चित्रपट बनवा.’ तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, ‘विनोदी आणि खोल भावना असलेला एक कल्ट क्लासिक चित्रपट. यादीत आणखी एक उत्कृष्ट चित्रपट जोडला जाणार आहे.’
Taran Adarsh on Sitaare Zameen par@AamirsDevotee @Dev_Atheist #SitaareZameenParReview #AamirKhan pic.twitter.com/dcSH1N6Y6J
— Antoyy (@ImAntoyy) June 20, 2025
ABCD फेम अभिनेत्री Lauren Gottlieb ने गुपचूप उरकलं लग्न, लग्नातले फोटो व्हायरल!
‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचे ओपनिंग डे कलेक्शन
आमिर खानच्या सितारे जमीन पर या चित्रपटाला रिलीज झाल्यापासून ज्या प्रकारे लोकांच्या प्रतिक्रिया मिळत आहेत, त्यावरून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल अशी अपेक्षा आहे. ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्श यांनी सांगितले होते की आमिर खानचा चित्रपट पहिल्या दिवशी ७.५ ते ८ कोटी रुपयांचा व्यवसाय करू शकतो. या चित्रपटात आमिर खानसोबत जेनेलिया डिसूझा मुख्य भूमिकेत आहे. तसेच आणखी १० नवे कलाकार काम करताना दिसणार आहे.