(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
रेमो डिसूझाचा ‘एबीसीडी’ हा चित्रपट खूप चर्चेत आहे. या चित्रपटात दिसलेली अभिनेत्री लॉरेन गॉटलीब तुम्हाला माहीतच असेल. या अभिनेत्रीने इटलीमध्ये गुपचूप लग्न केले आहे. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच अभिनेत्री लॉरेन गॉटलीबने ११ जून रोजी इटलीच्या टस्कनी येथे एका खाजगी समारंभात ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले होते. यापूर्वी तिने गेल्या वर्षी २०२४ मध्ये कॅरिबियनमध्ये तिच्या साखरपुड्याची घोषणा केली होती.
अभिनेत्रीने लग्नाचा खुलासा केला
अभिनेत्री लॉरेन गॉटलीबने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिच्या लग्नाचा खुलासा केला आहे. तिने सांगितले की तिने लंडनमधील व्हिडिओ क्रिएटर टोबियास जोन्ससोबत तिचे नवीन आयुष्य सुरू केले आहे. लग्नाबद्दल बोलताना लॉरेन म्हणाली, ‘हे माझ्यासाठी खरोखर स्वप्न सत्यात उतरल्यासारखे होते. शांत क्षणांपासून ते सर्वात मोठ्या आश्चर्यांपर्यंत.’ असे अभिनेत्रीने म्हटले.
‘The Hunt – The Rajiv Gandhi Assassination Case’ मध्ये उलघडणार सत्य; कधी होणार वेब सिरीज रिलीज?
एबीसीडी अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘जेव्हा तिने आणि टोबियास जोन्सने लग्नाला होकार दिला, तेव्हा लग्नाच्या दिवशी सकाळी मी सर्वात आधी उठले. मी तयारी करत असताना खूप शांत झाली होती नंतर समजला. जेव्हा मी टोबियास जोन्सला त्याच्या कस्टम प्राडा टक्समध्ये मंडपात उभे असलेले पाहिले, तेव्हा मी स्वतःला सांगत राहिले की प्रत्येक क्षण लक्षात ठेव. एकही गोष्ट विसरू नको.’
पांढऱ्या गाऊनमध्ये ही अभिनेत्री खूपच सुंदर दिसली
लॉरेन गॉटलीबने ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले आहे. फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की अभिनेत्रीने ऑफ शोल्डर डीप कट नेकसह पांढरा गाऊन घातला आहे. तिच्या गाऊनवर पांढऱ्या मोत्यांचे सुंदर नक्षी काम केले आहे, जे आउटफिटला एक सुंदर टच देत आहे. लॉरेनने कमीतकमी मेकअपसह नो ज्वेलरी लूक निवडला आहे. केस साधे बांधलेले आहेत आणि कानात साध्या कानातल्या रिंग्ज घातल्या आहेत. त्याच वेळी, टोबियास जोन्सने काळा आणि पांढरा टक्सिडो घातला आहे.
एक गाडी आणि उलगडणार अनेक रहस्ये; ‘गाडी नंबर १७६०’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित!
गेल्या वर्षी साखरपुडा झाला होता
लॉरेन गॉटलीब आणि टोबियास जोन्सच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये, हे जोडपे एकमेकांसोबत रोमँटिक पोज देताना दिसत आहे. लॉरेनने गेल्या वर्षी ऑगस्ट २०२४ मध्ये टोबियास जोन्सशी साखरपुडा केला होता आणि हे दोघेही एकमेकांचे सोबती झाले.