फोटो सौजन्य - सोशल मिडीया
आशिता धवन आणि रजत दलाल वाद – बिग बॉस १८ चा फिनाले १९ जानेवारी रोजी झाला आणि आता सोशल मीडियावर सध्या शोची प्रचंड चर्चा सुरू आहे. टॉप ३ च्या शर्यतीमध्ये करनवीर मेहरा, विवियन डिसेना आणि रजत दलाल हे स्पर्धक होते. यामध्ये रजत दलाल हा तिसऱ्या क्रमांकांवर राहिला. त्याला आणि त्याच्या चाहत्यांना मोठा तो तिसऱ्या क्रमांकावर राहिल्यामुळे त्यांना धक्का बसला. रजत दलाल हा त्याच्या वादामुळे मागील काही वर्षांपासून प्रचंड चर्चेत आहे. त्यामुळे त्याच्या या अनेक सोशल मीडियाच्या वादामुळे तो बिग बॉसच्या घरामध्ये त्याचे व्यक्तिमत्त्व दाखवण्यासाठी आला होता. टॉप २ च्या यादीमध्ये विवियन डीसेना आणि करणवीर मेहरा हे दोघे होते. करणवीर मेहरा हा टेलिव्हिजनवरचा अनुभवी अभिनेता आहे त्याचबरोबर त्याने या इंडस्ट्रीमध्ये २० वर्ष काम केले आहे. परंतु त्याला त्याच्या कामासाठी फार काही शाब्बासी मिळाली नव्हती तर दुसरीकडे विवियन डीसेना हा इंडस्ट्रीमधील नावाजलेला अभिनेता आहे.
शोमध्ये सुरुवातीपासूनच करणवीर मेहराची त्याच्या व्यक्तिमत्त्वाने लोकप्रियता वाढली तर दुसरीकडे विवियन शोमध्ये फार काही करू शकला नाही. ज्यावेळी करणवीर मेहरा विजेता झाला तेव्हा मीडिया मंडळी त्याचबरोबर त्याचे चाहते सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत होते, तर दुसरीकडे रजत दलाल आणि विवियन डीसेनाचे चाहते त्याला ट्रोल करण्यात व्यस्त होते. यावर अभिनेत्याने फार काही प्रतिक्रिया दिली नाही. टीका करणाऱ्यांनी फक्त बिग बॉस १८ चा विजेता करणवीर मेहरालाच नाही तर त्याचे मित्र मंडळी मीडियातील पत्रकार एवढेच नव्हे तर त्याला सपोर्ट करणाऱ्या सदस्यांना देखील ट्रोल, जिवे मारण्याची धमकी एवढेच नव्हे तर बरेच काही घाणेरडे मेसेज केले होते. याला त्रासून आता अभिनेत्री आशीता धवन हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती आणि रजत दलाल आणि टीका करणाऱ्यावर निशाणा साधला होता.
सोशल मीडियावर पोस्ट करून आशिता धवनने सोशल मीडियावर लिहिले होते की, सर्व ट्रोलर्स, द्वेष करणाऱ्यांना, वयाने शरिराची लाज बाळगणाऱ्यांना, टपरीवर बसणाऱ्या चप्परींना, चेहराविरहित निराधार दलाल झुंड-जे स्वतःला आर्मी म्हणतात! तुम्ही मानवतेच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत आणि केवळ माझे मत दिल्याबद्दल (विचारल्यावर) माझी आणि माझ्या कुटुंबाची अवहेलना केली आहे. माझ्या सर्वात जुन्या पोस्ट्सवर जाण्यासाठी आणि भडिमार करण्यासाठी तुम्ही वेळ आणि त्रास घेतला आहे. द्वेष, शिवीगाळ, शाप आणि काय नाही यासह माझा कमेंट् विभाग… भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली लोकशाहीच्या गैरवापराने मी शॉक आणि अविश्वासात आहे असे ती म्हणाली.
पुढे ती म्हणाली की, सर्वशक्तिमान देवाकडूनच तुमच्या मुखाची पूजा केली जाते! ज्यांच्या मागे तुमच्यासारखे लोक आहेत त्यांच्या आयुष्यात काहीही चांगले घडू शकत नाही. तुम्ही चाहते नाही, गुंड आहात. तुम्ही विकत घेतलेले पल्टू आहात ज्याला सामाजिक प्रतिष्ठा नाही. इतरांना खाली आणून स्वतःच्या लोकांना कसे उंच करायचे हे तुम्हाला माहिती आहे? तुम्ही सर्व तुलना करत आहात, तुम्ही बाकी सर्व करत आहात आणि गोष्टी सांगत आहात. तो, रजत दलाल का सारे दलाल, निकलते रहे तुम बाल की खाल, लगता है कम पड गया तुम्हारा माल फस गये तुम जाल. ट्रॉफी तो ले उडा जनता का लाल…