(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
जर खरोखरच चाहत्यांचा वेडेपणा कुठे पाहायला मिळत असेल तर तो बॉलिवूडमध्ये नाही तर तो साऊथ चित्रपट स्टारच्या चाहत्यांमध्ये पाहायला मिळतो, जिथे लोक त्यांच्या आवडत्या स्टार्सना देवासारखे मानतात. रजनीकांत, जयललिता, खुशबू सुंदर आणि नमिता यांच्यानंतर आता समंथाचेही नाव या यादीत समाविष्ट झाले आहे. कारण आता एका चाहत्याने समंथाचे मंदिरही बांधले आहे आणि अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अभिनेत्रीचे मंदिर पाहून आता तिचे चाहते चकित झाले आहेत.
अभिनेत्री समांथा रूथ प्रभू यांच्या एका कट्टर चाहत्याने अलीकडेच आंध्र प्रदेशात तिच्या सन्मानार्थ एक मंदिर बांधले. २८ एप्रिल रोजी, तिचा ३८ वा वाढदिवस साजरा करताना, तिच्या चाहत्यांनी काही अनाथ मुलांसाठी जेवणाचे आयोजन देखील केले होते, आणि या भव्य मंदिराला चाहत्याने अभिमानाने ‘सामंथाचे मंदिर’ असं नाव देखील ठेवले आहे.
सलाम बॉम्बे फाउंडेशनकडून रंगभूमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे सबलीकरण
एका व्हायरल व्हिडिओमध्ये सामंथाची दोन मूर्ती दिसत आहेत, त्यापैकी एक दुसऱ्यापेक्षा किंचित मोठी आहे, मूर्ती समर्पित मंदिराच्या मध्यभागी ठेवली आहे. अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त मंदिर फुलांनी आणि ध्वजांनी सजवण्यात आले होते. तेनाली संदीप नावाच्या या चाहत्याने मुलांसोबत केक कापला आणि या खास प्रसंगी त्याच्यासाठी खास लंच पार्टीचे आयोजनही करण्यात आले होते.
A fan named #Sandeep built a temple for actress #Samantha in Bapatla.@Samanthaprabhu2 pic.twitter.com/Z5Zat1vhhE
— Milagro Movies (@MilagroMovies) April 28, 2025
चाहता दरवर्षी साजरा करतो सामंथाचा वाढदिवस
या चाहत्याने याबद्दल मीडियालाही सांगितले आणि म्हणाला, ‘माझे नाव तेनाली संदीप आहे. मी आलापडू ग्रामम, बापटला, आंध्र प्रदेश येथील आहे. मी समांथा गुरूचा खूप मोठा चाहता आहे. मी गेल्या तीन वर्षांपासून त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. मी तेव्हा हे मंदिरही बांधून घेतले. दरवर्षी मी मुलांना खाऊ घालतो आणि त्या दिवशी केक कापतो. त्यांची परोपकाराची वृत्ती मला प्रेरणा देते आणि मी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवू इच्छितो.’ असं तो म्हणाला.
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरी मोलकरणीने केली चोरी, लाखो रुपयांचे दागिने लंपास
सामंथाचे आगामी प्रोजेक्ट्स
दरम्यान, कामाच्या बाबतीत, समांथा शेवटची २०२४ च्या प्राइम व्हिडिओ मालिकेत ‘सिटाडेल: हनी बनी’ मध्ये वरुण धवनसोबत दिसली होती. ती पुढे ‘माँ इंती बंगाराम’मध्ये दिसणार आहे. ती तिच्या ट्रालाला मूव्हिंग पिक्चर्स या बॅनरखाली या प्रकल्पाची निर्मितीही करत आहे. याशिवाय, ती राज आणि डीके यांच्या आगामी नेटफ्लिक्स मालिकेत ‘रक्त युनिव्हर्स: द ब्लडी किंगडम’ मध्ये देखील दिसणार आहे. अभिनेत्रीने अनेक आगामी प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. जे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.