Actress Neha Malik House Maid Theft 34 Lakhs Gold Jewellery Police Complaint Filed
प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री नेहा मलिक सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीच्या मुंबईतल्या घरी चोरी झाली असून तिने मुंबईच्या अंबोली पोलिस स्थानकात धाव घेतली आहे. अभिनेत्रीच्या घरामध्ये तिच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीने डल्ला मारला आहे. तिने तब्बल ३४. ४९ लाखांची चोरी करत घरातून धूम ठोकली आहे. नेहाने पोलिस स्थानकांत मोलकरणीविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे.
प्रिती झिंटा भाजपामध्ये प्रवेश करणार ? चाहत्याच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिले थेट उत्तर
२५ एप्रिल २०२५ रोजी मुंबईतल्या अंधेरी पश्चिम येथील चार बंगला येथील तिच्या फ्लॅटमध्ये ही घटना घडली. अभिनेत्रीच्या घरात मोलकरणीने चोरी केल्याचा संशय येताच नेहासह तिच्या आईने मुंबईच्या अंबोली पोलिस स्थानकात मोलकरणीविरोधात गुन्हा दाखल केला. नेहा मलिकच्या घरामध्ये काम करणाऱ्या मोलकरणीचं नाव, शेनाज शेख असून ती ३७ वर्षांची आहे. पोलिसांनी तिला अंधेरीच्या जेबी नगर परिसरात अटक केली आहे. अभिनेत्री नेहा मलिक आणि तिची आई मंजू मलिक यांनी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये, मोलकरणीने लंपास केलेले सर्व दागिने मंजू मंजू मलिक (नेहाची आई) यांचेच होते.
Sitaare Zameen Par: चित्रपटाची ट्रेलर रिलीज डेट ढकलली पुढे, का घेतला अभिनेत्याने हा निर्णय?
नेहा मलिक आणि तिची आई अंधेरी पश्चिममधीस अदानी हाइट्स कॉम्प्लेक्समध्ये राहत होती. शेनाज शेख त्यांच्या घरी फेब्रुवारी महिन्यापासून कामाला होती. नेहाची आई दागिने अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये घालायची. ते दागिने अभिनेत्रीची आई बेडरुममधल्या कुलूप नसलेल्या लाकडी ड्रॉवरमध्ये ठेवायची. मालाड पश्चिम येथे राहणारी शेनाज शेख रोज नेहाच्या घरी यायची. तिला मंजू दागिने कुठे ठेवतात, याची कल्पना होती. तिने अनेकदा मंजू मलिक यांना कार्यक्रमानंतर ते दागिने काढून ड्रॉवरमध्ये ठेवताना पाहिलं होतं. नहमीच्याच ठिकाणी अभिनेत्रीच्या आईने सर्व दागिने एका पिशवीमध्ये ठेवले होते. मोलकरणीने अगदी व्यव्यस्थित नजर ठेवून नेहाच्या घरात चोरी केली आहे.
२५ एप्रिल २०२५ रोजी मोलकरणीने घरात चोरी केली. ज्यावेळी शेनाजने चोरी केली त्यादिवशी अभिनेत्रीची आई सकाळी ७:३० वाजता गुरुद्वारात गेल्या होत्या. त्यावेळी मोलकरीन घरातील साफसफाई करत होती. शेनाजला घराचं भाडं भरायचं होतं म्हणून तिने मंजू यांच्याकडून ९ हजार रुपये ॲडव्हान्समध्ये घेतले होते. दुसऱ्या दिवशी मोलकरीण कामावर न आल्याने त्यांनी तिला फोन केला. परंतु, तिचा फोनच लागला नाही. तेव्हाच मंजू यांच्या मनातली शंकेची पाल चुकचुकली. मंजू यांनी घरात पाहिले असता दागिने गायब झालेले दिसले. दागिन्यांची चोरी झाल्याचं कळताच मंजू यांनी नेहालाही त्यांनी याबाबत सांगितलं. चोरी झाल्यानंतर काही तासांतच नेहासह तिच्या आईने मुंबईच्या अंबोली पोलिस स्थानकात मोलकरणीविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी लगेचच ॲक्शन घेत आरोपी महिलेला अटक केली.