Salaam Bombay Foundation empowers students through theatre
कलेच्या शिक्षणामध्ये असलेली परिवर्तनाची ताकद दाखवण्यासाठी, सलाम बॉम्बे फाउंडेशनने शनिवारी सायंकाळी माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिरात “अहंकारक कहंकारकाची गोष्ट” हे मराठी नाटक सादर केले. या नाटकाचे लेखन सुप्रसिद्ध लेखक अजित दळवी यांनी केले तर दिग्दर्शन अभिजित झुंजारराव यांनी केले आहे.शासकीय आणि शासकीय अनुदानित शाळांमधील विद्यार्थी, जे फाउंडेशनच्या आर्ट्स अकॅडमी मधून प्रशिक्षित आणि रेपर्टरी कंपनीशी संबंधित आहेत, यांनी या नाटकात भूमिका साकारल्या.
या नाटकाची प्रेरणा वारली समाजाच्या कथाकथन परंपरेतून घेतली आहे. ‘अहंकारक’ (ऐकणारा) आणि ‘कहंकारक’ (सांगणारा) या संकल्पनांभोवती कथा गुंफली आहे. नाटकात अहंकाराच्या परिणामांवर, निसर्ग आणि संस्कृतीशी तुटलेल्या नात्यांवर आणि मुळांपासून दुरावल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. लोककथा, नृत्य, संगीत आणि रूपकांच्या माध्यमातून आत्मपरीक्षणाची एक सुंदर प्रवासयात्रा यात मांडण्यात आली आहे. बदलत्या भौतिकवादी जगात नम्रता, परंपरा आणि समुदायाचे महत्त्व पुन्हा समजावून देण्याचा संदेश या नाटकातून दिला गेला आहे.
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरी मोलकरणीने केली चोरी, लाखो रुपयांचे दागिने लंपास
सलाम बॉम्बे फाउंडेशनच्या सीनियर व्हाइस प्रेसिडेंट (आर्ट्स अँड मीडिया) राजश्री कदम म्हणाल्या, “या नाटकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संपूर्ण रंगकर्मी अनुभव मिळाला. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपली परंपरा आणि संस्कृती जपण्यावर भर दिला आहे आणि हे नाटक त्या संकल्पनांना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे त्यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या, ” सलाम बॉम्बे फाउंडेशनमध्ये आम्ही मानतो की कला ही लक्झरी नाही, ती आवश्यक गरज आहे. या उपक्रमातून आमच्या विद्यार्थ्यांनी केवळ नाटक सादर केले नाही, तर स्वतःच्या कथा पुन्हा सांगितल्या, आपल्या मुळांशी नव्याने नाते जोडले आणि जगाला दाखवले की प्रतिभेला कोणतीही सीमा नाही. हाच कला शिक्षणाचा खरा प्रभाव आहे — विद्यार्थ्यांना आवाज, व्यासपीठ आणि भवितव्य देणे.” विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव अत्यंत परिवर्तनकारी ठरला. त्यांनी केवळ स्क्रिप्ट लेखन, अभिनय आणि रंगमंच व्यवस्थापन शिकले नाही, तर खोल सांस्कृतिक व तात्त्विक संकल्पनांचा अनुभवही घेतला.
प्रिती झिंटा भाजपामध्ये प्रवेश करणार ? चाहत्याच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिले थेट उत्तर
या नाटकात सहभागी झालेला कलाकार चेतन वाघ म्हणाला , “हे नाटक सादर करताना मला जाणवले की आपल्या मूळ परंपरांमध्ये किती ताकद आहे. फक्त अभिनय नव्हता, तर जणू त्या कथांचा आणि भावना जगण्याचा अनुभव मिळाला. हे करताना मला आत्मविश्वास मिळाला की मी स्वतःसाठीच नव्हे तर संपूर्ण समुदायासाठी काहीतरी अर्थपूर्ण तयार करू शकतो.”
२०१६ साली सुरू झालेली सलाम बॉम्बे फाउंडेशनची रेपर्टरी कंपनी थिएटर, नृत्य व संगीत अकादमीच्या माजी विद्यार्थ्यांसाठी व्यासपीठ म्हणून कार्य करते. प्रशिक्षणानंतर त्यांच्या कलात्मक प्रवासात व्यावसायिक जगात शिरकाव करण्याचा दुवा म्हणून ही कंपनी काम करते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव, आत्मविश्वास आणि कलेत करिअरची नवी दारे खुली होतात.