Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोविंदाची पत्नी सुनीता पुन्हा चर्चेत! म्हणते “Govinda सारखा मुलगा हवा पती नको” काय आहे प्रकरण?

गोविंदा आणि सुनीता आहुजा पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. सुनीताने “मला गोविंदासारखा मुलगा चालेल, पण पती नाही” असे स्पष्ट वक्तव्य केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 26, 2026 | 08:28 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सुनीता आहुजा तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. सुनीता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, तिच्या बेधडक विधानांमुळे! सुनिताने चक्क लग्नाच्या इतक्या वर्षानंतर “मला गोविंदासारखा मुलगा चालेल पण पती नाही!” असे वक्तव्य केले आहे. तसेच या विधानामागचे कारणही तिने स्पष्ट केले आहे.

Michael Movie : ‘King of Pop ची जादू!’ सिनेमाचा जगभरात क्रेझ; लिमिटेड स्क्रीन्स पण धमक्यावर धमाका

सुनीताने एका मुलाखतीदरम्यान गोविंदा उत्तम मुलगा आणि भाऊ आहेत असे सांगितले, परंतु पती म्हणून तिच्या अपेक्षेप्रमाणे नाहीत असे तिचे मत आहे. याविषयी सांगताना सुनीताने कारणही स्पष्ट केले आहे. तिचे म्हणणे आहे की तिला पार्टी करायला आवडते, बाहेर डिनरला जायला आवडतं तसेच सुट्ट्यांमध्ये इथेतिथे फिरून एन्जॉय करायला आवडतं. पण गोविंदाने संपूर्ण आयुष्यभर कुटुंबाची फक्त सेवाच केली आहे. स्वतःसाठी एक मिनिटही वेळ काढला नाही. सुनीताचे म्हणे आहे की गोविंदाने व्यक्ती म्हणून आयुष्यत बरंच काही कमावलं पण वैयक्तिक आयुष्यात मात्र त्याने काहीच कमावले नाही, वैयक्तिक आयुष्याचा त्याने काहीच आनंद घेतला नाही.

मुळात, सुनीताने आधीही स्पष्ट केले होती की तिला गोविंदासारखा मुलगा हवा पण पती म्हणून गोविंदा नको. त्यामुळे गोविंदाच्या अनेक चाहत्यांनी भुवया उंचावल्या होत्या, परंतु सुनीताने त्यामागचे कारण स्पष्ट केल्यावर तिच्या म्हणण्यामागचा खरा पैलू समजला. ती म्हणते की, “आता गोविंदा 60 वर्षांचा झाला आहे. या आयुष्यात त्या माणसाने कधीच स्वतःसाठी आयुष्य जगले नाही. मला खरंच फार वाईट वाटत त्याच्याकडे बघून की इतका मोठा सुपरस्टार असूनही या माणसाने काहीच आयुष्य अनुभवले नाही.”

1987 साली गोविंदा आणि सुनीताचे लग्न झाले. आपल्या अभिनय कामावर परिणाम होऊ नये म्हणून काही काळासाठी गोविंदाने त्याचे वैवाहिक आयुष्य गुपित ठेवले पण जेव्हा ते समोर आले तेव्हापासून हे बॉलिवूडचे जोडपे नेहमीच चर्चेत राहिले. या मुलाखतीत सुनीता म्हणते की, “गेल्या 40 वर्षांपासून आम्ही एकत्र आहोत. त्यामुळे आता आम्हाला वेगळं होण्याचा विचारही करता येत नाही.” ती म्हणते की आता पश्चात्तापही करू शकत नाही.

Bai Tujha Ashirvad : ‘बाई तुझा आशीर्वाद’ मालिकेच्या टीमने केली नाशिकमधील रामकुंड येथे गोदा आरती!

गोविंदा यांनी आपल्या अभिनय, नृत्यशैली आणि कॉमिक टाइमिंगमुळे मोठे यश मिळवले असून त्यांच्या यशामागे कुटुंबाचा मोठा वाटा आहे. सुनीता आहुजा यांनी त्यांच्या कारकिर्दीत कायम पाठिंबा दिला आहे. मात्र त्यांच्या वक्तव्यामुळे वैयक्तिक आयुष्याबाबत नवी चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर काहींनी त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचे कौतुक केले, तर काहींनी टीका केली. या प्रकरणातून सेलिब्रिटींचे वैयक्तिक आयुष्यही गुंतागुंतीचे असल्याचे दिसून आले. नात्यांतील अपेक्षा आणि वास्तव यावर पुन्हा विचार करण्याची संधी या चर्चेमुळे मिळाली.

Web Title: Sunita ahuja wife of govinda stats wants govinda as a son not as husband

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 08:28 PM

Topics:  

  • Govinda
  • sunita ahuja

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.