Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सत्ता विरुद्ध न्यायाचा संघर्ष, System चा दमदार ट्रेलर, चित्रपट ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

प्राइम ओरिजिनल चित्रपट सिस्टम हा एक प्रभावी न्यायालयीन थरारपट असून त्याचे दिग्दर्शन अश्विनी अय्यर तिवारी यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती बावेजा स्टुडिओजच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. कधी होणार पदर्शित?

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 12, 2026 | 02:55 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • चित्रपट सिस्टम हा एक प्रभावी न्यायालयीन थरारपट
  • या तारखेला होणार प्रदर्शित
  • चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, ज्योतिकासह हे कलाकार
System Trailer: प्राइम ओरिजिनल चित्रपट सिस्टम हा एक प्रभावी न्यायालयीन थरारपट असून त्याचे दिग्दर्शन अश्विनी अय्यर तिवारी यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती बावेजा स्टुडिओजच्या बॅनरखाली पम्मी बावेजा, हरमन बावेजा आणि स्मिता बालिगा यांनी केली आहे. चित्रपटाचे लेखन हरमन बावेजा, अरुण सुकुमार, अश्विनी अय्यर तिवारी, तसनीम लोखंडवाला आणि अक्षत घिल्डियाल यांनी केले आहे.

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीचा होणार घटस्फोट ? नवरा दुबईत अन्…, ‘या’ कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण

या तारखेला होणार प्रदर्शित

सिस्टममध्ये सोनाक्षी सिन्हा, ज्योतिका आणि आशुतोष गोवारिकर प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यांच्यासोबत प्रीती अग्रवाल, अदिनाथ कोठारे, आश्रिया मिश्रा, गौरव पांडे आणि सयानदीप सेनगुप्ता महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.सिस्टम हा चित्रपट २२ मे रोजी हिंदी भाषेत भारतासह जगभरातील २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम व्हिडिओवर विशेष प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, ज्योतिकासह हे कलाकार

प्राइम व्हिडिओने आज आपल्या आगामी ओरिजिनल चित्रपट सिस्टमचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. हा एक प्रभावी न्यायालयीन थरारपट असून, ज्या व्यवस्थेत सत्ता सत्य ठरवते त्या व्यवस्थेला प्रश्न विचारणारी ही कथा आहे. अश्विनी अय्यर तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाची निर्मिती पम्मी बावेजा, हरमन बावेजा आणि स्मिता बालिगा यांनी केली आहे. सिस्टममध्ये महत्त्वाकांक्षा, सूड, न्यायासाठीचा संघर्ष आणि नैतिक मूल्ये अशा सार्वत्रिक विषयांना स्पर्श करण्यात आला आहे.
हरमन बावेजा, अरुण सुकुमार, अश्विनी अय्यर तिवारी, तसनीम लोखंडवाला आणि अक्षत घिल्डियाल यांनी लिहिलेल्या या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, ज्योतिका आणि आशुतोष गोवारिकर प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यांच्यासोबत प्रीती अग्रवाल, अदिनाथ कोठारे, आश्रिया मिश्रा, गौरव पांडे आणि सयानदीप सेनगुप्ता महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकतील. सिस्टम हा चित्रपट २२ मे रोजी हिंदी भाषेत भारतासह जगभरातील २४० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम व्हिडिओवर विशेष प्रदर्शित होणार आहे.

सोनाक्षी सिन्हा ठाम, जिद्दी वकीलच्या भूमिकेत

सिस्टमचा ट्रेलर नेहापासून सुरू होतो. सोनाक्षी सिन्हाने साकारलेली नेहा ही एक ठाम आणि जिद्दी तरुण वकील आहे. तिला तिचे वडील, ज्यांची भूमिका आशुतोष गोवारिकर यांनी साकारली आहे, एक कठीण आव्हान देतात. जर तिला त्यांच्या संस्थेत भागीदार व्हायचे असेल तर स्वतःला सिद्ध करावे लागेल. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी ती सारिकाला सोबत घेते. ज्योतिका साकारत असलेली सारिका ही एक हुशार न्यायालयीन लिपिक असून तिचे स्वतःचे काही गुपित हेतूही आहेत.
यानंतर ट्रेलरमध्ये वेगवान न्यायालयीन संघर्ष, गुंतागुंतीची नाती आणि अनेक प्रभावी प्रसंगांची झलक पाहायला मिळते. “श्रीमंतीच्या गोंगाटात गरीबाचा आवाज हरवून जातो” हा प्रभावी संवाद थेट चित्रपटाच्या मुख्य संघर्षाला अधोरेखित करतो. सत्ता आणि प्रभाव सत्यावर भारी पडणाऱ्या व्यवस्थेत न्याय अजून जिवंत आहे का, की त्याला लढण्याची संधीच उरलेली नाही, हा प्रश्न ट्रेलर प्रेक्षकांसमोर ठेवतो.

Anupam Kher : ‘जिथे राजने सिमरनचा हात धरला…’ त्या ऐतिहासिक ठिकाणी पोहोचले अनुपम खेर; महाराष्ट्र सरकारकडे केली खास मागणी

त्यातूनच सिस्टमचा जन्म – अश्विनी तिवारी

सिस्टमच्या दिग्दर्शिका आणि सहलेखिका अश्विनी अय्यर तिवारी म्हणाल्या, “माझा विश्वास आहे की आपल्या आजूबाजूला असंख्य कथा आहेत, पण त्या प्रामाणिकपणे आणि सर्जनशील पद्धतीने पडद्यावर जिवंत करणे सोपे नसते. मला स्वतःला सतत नवीन आव्हाने द्यायला आवडते आणि त्यातूनच सिस्टमचा जन्म झाला.” त्या पुढे म्हणाल्या, “प्राइम व्हिडिओने या वेधक कथेबाबत माझ्या दृष्टिकोनावर विश्वास दाखवला याचा मला आनंद आहे. समाजात आपण कुठे उभे आहोत, त्यानुसार न्यायाची अनुभूती कशी बदलते हे ही कथा दाखवते. या कथेच्या केंद्रस्थानी सोनाक्षी सिन्हा आणि ज्योतिका यांसारखी दोन प्रभावी महिला व्यक्तिरेखा आहेत. मला खात्री आहे की हा ओरिजिनल चित्रपट केवळ मनोरंजनच करणार नाही, तर भारतासह जगभरातील प्रेक्षकांमध्ये सांस्कृतिक चर्चेलाही चालना देईल.”

समाजात जगतो त्याचेही वास्तव – सोनाक्षी सिन्हा

नेहाची भूमिका साकारणारी सोनाक्षी सिन्हा, जी चित्रपटात महत्त्वाकांक्षी सरकारी वकील साकारत आहे, म्हणाली, “हा पात्र साकारणे माझ्यासाठी अत्यंत खास आणि समाधानकारक अनुभव होता. मला नेहमी अशा कथा आकर्षित करतात ज्या मला कलाकार म्हणून आव्हान देतात. प्राइम व्हिडिओमुळे मला दहाडपासून सिस्टमपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या कथा आणि विषय अनुभवण्याची संधी मिळाली. हा चित्रपट केवळ न्यायालयीन नाट्य नाही, तर आपण ज्या समाजात जगतो त्याचेही वास्तव दाखवतो, जिथे कधी कधी न्यायसुद्धा सामाजिक रचनेप्रमाणे विभागलेला दिसतो. अश्विनी यांच्या स्पष्ट दृष्टिकोनामुळे मला माझे सर्वोत्तम देणे शक्य झाले आणि आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.”

सिस्टम प्रत्येक प्रेक्षकाच्या मनाला भिडेल

आपल्या बहुआयामी अभिनयासाठी ओळखली जाणारी ज्योतिका, जी चित्रपटात न्यायालयीन लिपिक सारिकाची भूमिका साकारत आहे, म्हणाली, “सिस्टममध्ये इतकी स्तर असलेली व्यक्तिरेखा साकारणे माझ्यासाठी रोमांचक आणि आव्हानात्मक अनुभव होता. हा चित्रपट आधुनिक भारतातील विशेषाधिकार आणि विषमता एकाच वेळी कशी अस्तित्वात असते हे दाखवतो. अश्विनी यांचा कथेकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय स्पष्ट आणि प्रभावी आहे. मजबूत व्यक्तिरेखा आणि वास्तवदर्शी वातावरण यांमुळे ही कथा अधिक जिवंत वाटते. प्राइम ओरिजिनल चित्रपटाचा भाग होणे माझ्यासाठी सुंदर अनुभव ठरला. प्राइम व्हिडिओ भारतासह जगभरातील प्रेक्षकांपर्यंत अर्थपूर्ण कथा पोहोचवण्यासाठी ओळखला जातो आणि मला पूर्ण विश्वास आहे की सिस्टम प्रत्येक प्रेक्षकाच्या मनाला भिडेल.”

Web Title: System trailer sonakshi sinha jyotika ashutosh gowariker prime video see details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 02:55 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.