Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Taapsee Pannu चा ‘गांधारी’मधून दमदार कमबॅक; VFX शिवाय अभिनेत्रीने साकारले खतरनाक स्टंट

‘नाम शबाना’नंतर ‘गांधारी’मधून दमदार अ‍ॅक्शनमध्ये तापसी पन्नू पुनरागमन करत आहे. अभिनेत्रीला पुन्हा ॲक्शन भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 06, 2026 | 03:22 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • तापसी पन्नूचा ‘गांधारी’मधून दमदार कमबॅक
  • VFX शिवाय अभिनेत्रीने केले खतरनाक स्टंट
  • तापसी पन्नूची ‘गांधारी’मध्ये अनोखी भूमिका
 

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू पुन्हा एकदा प्रेक्षकांना अ‍ॅक्शनचा जबरदस्त अनुभव देण्यासाठी सज्ज झाली आहे. तिचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘गांधारी’ सध्या चर्चेत असून, या चित्रपटातून ती पुन्हा एकदा हाय-ऑक्टेन अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे. ‘बेबी’ आणि नाम शबाना मधील तिच्या दमदार परफॉर्मन्सनंतर चाहत्यांना तिच्या अ‍ॅक्शन अवताराची प्रतीक्षा होती, जी आता ‘गांधारी’मुळे पूर्ण होणार आहे.

या चित्रपटाबद्दल बोलताना तापसी पन्नू यांनी स्पष्ट केलं की, हा प्रोजेक्ट तिच्या करिअरसाठी खूप खास आहे. “मी ‘नाम शबाना’नंतर पुन्हा एकदा गंभीर अ‍ॅक्शन करत आहे. बराच काळ झाला आहे. लोक मला नेहमी विचारतात की, तू पुन्हा अ‍ॅक्शन कधी करणार? त्यांना माझं आधीचं काम आठवतं,” असे अभिनेत्रीने म्हटले आहे.

‘प्रेम सगळं काही नसतं’, Trisha Krishnan ची पोस्ट चर्चेत, Thalapathy Vijay सोबत अफेअरच्या अफवांदरम्यान पोस्ट व्हायरल

विशेष म्हणजे, ‘गांधारी’मधील अ‍ॅक्शन सीक्वेन्सेसमध्ये कोणत्याही प्रकारच्या VFX, ब्लू स्क्रीन किंवा फेस रिप्लेसमेंटचा वापर करण्यात आलेला नाही. आजच्या काळात जेथे अनेक चित्रपटांमध्ये तांत्रिक साधनांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहिलं जातं, तिथे तापसीने स्वतः अ‍ॅक्शन सीन साकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या चित्रपटातील प्रत्येक सीन अधिक वास्तववादी आणि प्रभावी वाटणार आहे.

अभिनेत्रीने पुढे सांगितले, “फेस रिप्लेसमेंटसारखी तंत्रज्ञानं मोठ्या बजेटच्या चित्रपटांमध्ये सहज वापरता येतात. पण माझ्या चित्रपटांमध्ये तसं नसतं, त्यामुळे मला सगळं स्वतः करावं लागतं. हे हवेत उडणाऱ्या फॅन्सी अ‍ॅक्शनसारखं नाही, तर वास्तववादी आहे. त्यामुळे ते खूपच कठीण आणि थकवणारं असतं.” असे अभिनेत्रीने म्हटले आहे.

‘नाम शबाना’नंतर काही काळ तापसीने जाणीवपूर्वक अ‍ॅक्शनपासून अंतर ठेवले होते. कारण अशा प्रकारच्या भूमिकांसाठी केवळ मानसिकच नाही, तर शारीरिक तयारीही तितकीच महत्त्वाची असते. “मी स्वभावतः आक्रमक व्यक्ती नाही, त्यामुळे अशा भूमिका साकारताना स्वतःला पूर्णपणे बदलावं लागतं. ‘गांधारी’मध्ये तुम्ही मला भरपूर अ‍ॅक्शन करताना पाहाल, आणि हे सगळं मी स्वतः केलं आहे,” असं अभिनेत्रीचे म्हणणे आहे.

‘भूत बंगला’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज; अक्षय कुमार आणि प्रियदर्शनच्या जोडीचा कॉमेडी-हॉरर धमाका

अलीकडेच ‘अस्सी’मधील भावनिक भूमिकेमुळे प्रेक्षकांची मनं जिंकणारी तापसी पन्नू आता ‘गांधारी’च्या माध्यमातून अ‍ॅक्शनची झलक दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या या नव्या अवतारामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. एकंदरीत, ‘गांधारी’ हा केवळ अ‍ॅक्शन चित्रपट नसून, एका अभिनेत्रीच्या मेहनतीचा, जिद्दीचा आणि स्वतःला सतत नव्याने सिद्ध करण्याच्या प्रवासाचा पुरावा आहे. येत्या काही महिन्यांत प्रदर्शित होणारा हा चित्रपट नक्कीच बॉक्स ऑफिसवर मोठा ठसा उमटवेल, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Taapsee pannu gandhari movie real action no vfx bollywood comeback

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 03:22 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Taapsee Pannu

संबंधित बातम्या

Taapsee Pannu: ‘गांधारी’ची ग्लोबल झेप; ४० हून अधिक देशांत ट्रेंडिंग, अभिनेत्री भावुक
1

Taapsee Pannu: ‘गांधारी’ची ग्लोबल झेप; ४० हून अधिक देशांत ट्रेंडिंग, अभिनेत्री भावुक

Divorce And Home Loan : घटस्फोट झाल्यावर जॉइंट होम लोनच्या EMI चं काय? बँक कोणाकडून पैसे करते वसूल? जाणून घ्या नियम
2

Divorce And Home Loan : घटस्फोट झाल्यावर जॉइंट होम लोनच्या EMI चं काय? बँक कोणाकडून पैसे करते वसूल? जाणून घ्या नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.