Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rinku Rajguru New Movie: कपाळावर चंद्रकोर, नजरेत अनुत्तरित प्रश्न! रिंकूच्या ‘जिजाई’च्या पोस्टरनं वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

Rinku Rajguru New Movie: रिंकू राजगुरूच्या ‘जिजाई’ चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. कपाळावरील चंद्रकोर आणि रहस्यमयी नजरेनं वाढवली उत्सुकता. चित्रपट २० नोव्हेंबरला रिलीज होणार.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 20, 2026 | 12:45 PM
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Rinku Rajguru New Movie:  मराठी मनोरंजनविश्वात अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या आगामी ‘जिजाई’ या चित्रपटाची चर्चा रंगू लागली आहे. नुकतंच या चित्रपटाचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, त्यातील रिंकूचा लूक लक्ष वेधून घेत आहे. कपाळावर लाल चंद्रकोर, डोळ्यांत वेगळीच चमक आणि नजरेत अनेक अनुत्तरित प्रश्न… अशा रूपातील रिंकूने पोस्टरमधून प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत हा चित्रपट येत्या २० नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

रिंकूच्या नजरेत दडलंय काय? पोस्टरमुळे उत्सुकता वाढली

‘जिजाई’च्या पोस्टरमध्ये रिंकूचा संपूर्ण चेहरा दाखवण्यात आलेला नाही. तिचे डोळे आणि कपाळावरील लाल चंद्रकोर यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. चेहऱ्यावर पडणारा प्रकाश, डोळ्यांतील भाव आणि सोनेरी अक्षरांतील ‘जिजाई’ हे शीर्षक पोस्टरला एक वेगळीच दृश्यात्मक ओळख देत आहे.

मात्र, रिंकूच्या व्यक्तिरेखेचं नेमकं स्वरूप काय, तिच्या कपाळावरील चंद्रकोरीचं महत्त्व काय आणि तिच्या नजरेमागची कहाणी कोणती, असे अनेक प्रश्न या पोस्टरमुळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या कथेबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

आजच्या लढवय्या स्त्रीची कहाणी

या चित्रपटाचं दिग्दर्शन तृशांत इंगळे यांनी केलं आहे. झी स्टुडिओजने चित्रपटाची निर्मिती केली असून कोकोनट फिल्म्सने सहनिर्मिती केली आहे. नुपूर गुहा आणि तुषार राऊत हेही या चित्रपटाच्या सहनिर्मितीशी जोडलेले आहेत.

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक तृशांत इंगळे म्हणाले, “प्रत्येक व्यक्तिरेखेला स्वतःची एक गोष्ट असते आणि ती गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची ताकद चित्रपटाच्या मांडणीत असते. ‘जिजाई’च्या बाबतीतही आम्ही काहीतरी वेगळं मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात हा चित्रपट आजच्या स्त्रीचा आहे. जी लढवय्या आहे. पोस्टरमधून प्रेक्षकांना कथेची उत्सुकता वाटावी आणि त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण व्हावेत, अशी आमची इच्छा होती. रिंकूने या भूमिकेला दिलेला न्याय आणि चित्रपटातील तिचं रूप प्रेक्षकांसाठी नक्कीच खास असेल.”

OTT Releases This Week: वीकेंडचं प्लॅनिंग झालं का? OTT वर या आठवड्यात रिलीज होणार ७ नवे चित्रपट आणि वेब सीरिज, पाहा संपूर्ण यादी!

झी स्टुडिओजला ‘जिजाई’कडून अपेक्षा

झी स्टुडिओजचे मराठी व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनीही या चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त केली. ते म्हणाले, “झी स्टुडिओज नेहमीच वेगळ्या आशयाच्या आणि प्रेक्षकांना नव्या अनुभवाची ओळख करून देणाऱ्या चित्रपटांना प्राधान्य देत आलं आहे. ‘जिजाई’ हा त्याच प्रवासातील एक महत्त्वाचा चित्रपट आहे. रिंकू राजगुरूसारखी गुणी अभिनेत्री आणि नवोदित दिग्दर्शक तृशांत इंगळे यांच्यासोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आणखी वाढेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

२० नोव्हेंबरला उलगडणार ‘जिजाई’ची कहाणी

रिंकू राजगुरूच्या या चित्रपटात आणखी कोणते कलाकार झळकणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोस्टरमधून कथेची झलक दाखवत निर्मात्यांनी प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. आता या प्रश्नांची उत्तरं चित्रपटातून कशी मिळणार आणि रिंकूची व्यक्तिरेखा कोणती नवी गोष्ट सांगणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ‘जिजाई’ २० नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

Ramayana Movie: रामायण’मध्ये सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? यशने सांगितलं खास कारण!

Web Title: Rinku rajguru new movie jijai poster release date ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 12:45 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • rinku rajguru

संबंधित बातम्या

Tiger Shroff Attack: टायगर श्रॉफवर हल्ल्याचा कट आठवडाभर आधीच रचला होता? शूटरही पोहोचले होते, पण पुढे काय घडलं?
1

Tiger Shroff Attack: टायगर श्रॉफवर हल्ल्याचा कट आठवडाभर आधीच रचला होता? शूटरही पोहोचले होते, पण पुढे काय घडलं?

Ramayana Movie: रामायण’मध्ये सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? यशने सांगितलं खास कारण!
2

Ramayana Movie: रामायण’मध्ये सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? यशने सांगितलं खास कारण!

Jailer 2 Box Office: रजनीकांतचा ‘जेलर २’ ठरतोय बॉक्स ऑफिसचा किंग! चार दिवसांत ४०० कोटींची कमाई, ‘धुरंधर २’चा विक्रम मोडला
3

Jailer 2 Box Office: रजनीकांतचा ‘जेलर २’ ठरतोय बॉक्स ऑफिसचा किंग! चार दिवसांत ४०० कोटींची कमाई, ‘धुरंधर २’चा विक्रम मोडला

Bigg Boss 20: बिग बॉस २० चा नवा होस्ट कोण? सलमान खानच्या जागी येणाऱ्या अभिनेत्याचं नाव आलं समोर!
4

Bigg Boss 20: बिग बॉस २० चा नवा होस्ट कोण? सलमान खानच्या जागी येणाऱ्या अभिनेत्याचं नाव आलं समोर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.