Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ayushmann Khurrana: नेपाळमध्ये आयुष्मान खुरानाच्या चित्रपटावर बंदी; पाकिस्तानी कनेक्शनमुळे चर्चेला उधाण!

Ayushmann Khurrana: आयुष्मान खुराना आणि सारा अली खानच्या ‘उडता तीर’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला नेपाळमध्ये परवानगी नाकारण्यात आली. काय आहे भारत-पाकिस्तान कनेक्शन?

  • By अमृता यादव
Updated On: Oct 20, 2026 | 02:40 PM
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Ayushmann Khurrana:  बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री सारा अली खान यांचा आगामी ‘उडता तीर’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याला मोठा धक्का बसला आहे. नेपाळमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी नाकारण्यात आली असून, त्याचे प्रदर्शन थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचे चित्रण हे या निर्णयामागील प्रमुख कारण असल्याचे वृत्त आहे.

नेपाळच्या माहिती आणि संचार मंत्रालयाचा निर्णय

मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळच्या माहिती आणि संचार मंत्रालयाने (MIN) चित्रपट वितरण कंपनी नॅशनल सिने ग्रुपला चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी नाकारल्याचे कळवले आहे. आकाश कौशिक दिग्दर्शित हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र, मंत्रालयाच्या ऑडिओ-व्हिडिओ आणि टेलिकास्ट शाखेने चित्रपटाची सामग्री निर्मिती, प्रदर्शन आणि वितरण कायदा, २०२६ मधील कलम ८(३) अंतर्गत प्रतिबंधित असल्याचे म्हटले आहे. या तरतुदीनुसार, संबंधित चित्रपटाला सार्वजनिक प्रदर्शनाची परवानगी देता येत नाही.

काय आहे ‘उडता तीर’चे पाकिस्तान कनेक्शन?

‘उडता तीर’ हा करण जोहरच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली तयार झालेला स्पाय थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना, सारा अली खान, गुलशन ग्रोव्हर आणि राम कपूर यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

चित्रपटाची कथा एका पाकिस्तानी एजंटभोवती फिरते. हा एजंट भारतात दाखल झाल्यानंतर एका अपघातात त्याची स्मरणशक्ती गमावतो. त्यानंतर त्याचा भारताशी जिव्हाळा निर्माण होतो आणि तो भारताच्या बाजूने उभा राहून पाकिस्तानमधील दहशतवादी आणि गुप्तहेरांना पकडण्याच्या मोहिमेत सहभागी होतो, अशी या चित्रपटाची कथावस्तू आहे.

 

OTT Releases This Week: वीकेंडचं प्लॅनिंग झालं का? OTT वर या आठवड्यात रिलीज होणार ७ नवे चित्रपट आणि वेब सीरिज, पाहा संपूर्ण यादी!

भारत-पाकिस्तानमधील तणावाचे चित्रण ठरले कारण?

समोर आलेल्या वृत्तांनुसार, चित्रपटात भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचे विकृत चित्रण करण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या सार्वजनिक प्रदर्शनावर बंदी घालण्यात आल्याचे सांगितले जात आहे. नेपाळमध्ये एखाद्या देशाच्या किंवा तेथील समुदायाच्या राष्ट्रीयत्वावर थेट परिणाम करणाऱ्या चित्रपटांच्या प्रदर्शनावर निर्बंध घालण्याची तरतूद असल्याचेही वृत्त आहे.

दरम्यान, ‘उडता तीर’च्या प्रदर्शनाबाबत नेपाळमध्ये घेतलेल्या या निर्णयामुळे चित्रपटाच्या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. मात्र, या निर्णयासंदर्भातील अधिकृत स्पष्टीकरण आणि चित्रपटाच्या निर्मात्यांची प्रतिक्रिया याबाबतची माहिती समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबारासाठी वापरलेली बाईक २५ हजारांना खरेदी; नवरात्रीमुळे कागदपत्रं रखडली, तपासात मोठा खुलासा

Web Title: Udta teer movie ban nepal ayushmann khurrana sara ali khan ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • Ayushmann Khurrana
  • entertainment
  • Hindi Movie

संबंधित बातम्या

Prajakta Mali Gauri Movie: ‘फुलवंती’नंतर प्राजक्ता माळीची नवी निर्मिती; ‘गौरी’तून मांडणार स्त्रीशक्तीचा विचार
1

Prajakta Mali Gauri Movie: ‘फुलवंती’नंतर प्राजक्ता माळीची नवी निर्मिती; ‘गौरी’तून मांडणार स्त्रीशक्तीचा विचार

Rinku Rajguru New Movie: कपाळावर चंद्रकोर, नजरेत अनुत्तरित प्रश्न! रिंकूच्या ‘जिजाई’च्या पोस्टरनं वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता
2

Rinku Rajguru New Movie: कपाळावर चंद्रकोर, नजरेत अनुत्तरित प्रश्न! रिंकूच्या ‘जिजाई’च्या पोस्टरनं वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

OTT Releases This Week: वीकेंडचं प्लॅनिंग झालं का? OTT वर या आठवड्यात रिलीज होणार ७ नवे चित्रपट आणि वेब सीरिज, पाहा संपूर्ण यादी!
3

OTT Releases This Week: वीकेंडचं प्लॅनिंग झालं का? OTT वर या आठवड्यात रिलीज होणार ७ नवे चित्रपट आणि वेब सीरिज, पाहा संपूर्ण यादी!

Tiger Shroff Attack: टायगर श्रॉफवर हल्ल्याचा कट आठवडाभर आधीच रचला होता? शूटरही पोहोचले होते, पण पुढे काय घडलं?
4

Tiger Shroff Attack: टायगर श्रॉफवर हल्ल्याचा कट आठवडाभर आधीच रचला होता? शूटरही पोहोचले होते, पण पुढे काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.