Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘इंदर’ आणि ‘सुरू’ची लव्हस्टोरी पडद्यावर परतणार, ‘सनम तेरी कसम 2’ची दीपक मुकुटने केली घोषणा!

जेव्हा जेव्हा बॉलिवूडच्या सॅड-रोमँटिक चित्रपटांची चर्चा होते तेव्हा सनम तेरी कसमचा उल्लेख नक्कीच होतो. 2016 मध्ये रिलीज झालेला हा सिनेमा हिंदी सिनेमातील सर्वोत्कृष्ट आणि उत्कृष्ट रोमँटिक कथांपैकी एक मानला जातो. चाहते चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते आणि आता निर्मात्यांनी एक खास घोषणा करून त्यांची प्रतीक्षा संपवली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 10, 2024 | 02:58 PM
(फोटो सौजन्य- Xअकाउंट)

(फोटो सौजन्य- Xअकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

हिंदी चित्रपटसृष्टीतील रोमँटिक चित्रपटांचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा त्यात शाहरुख खानच्या चित्रपटांचा समावेश नक्कीच होतो. पण आता त्याच्या चित्रपटांव्यतिरिक्त इतरही काही कलाकारांचे रोमँटिक चित्रपट आहेत, जे प्रेक्षकांची पहिली पसंती बनली आहे. ‘सनम तेरी कसम’ हा चित्रपट 2016 मध्ये रिलीज झाला होता, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडला देखील होता. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट देखील पाहत होते. याचदरम्यान आता निर्मात्यांनी या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. बॉलिवूडमध्ये सध्या सिक्वेल चित्रपटांचा ट्रेंड वाढत असतानाच, दीपक मुकुटने चाहत्यांच्या मनात खळबळ माजवणाऱ्या ‘सनम तेरी कसम’ या हिट चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे.

‘सनम तेरी कसम 2’ ची घोषणा
‘सनम तेरी कसम 2’ च्या घोषणेची माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिली आहे. मात्र या घोषणेसोबत आणखी दोन चांगल्या बातम्या समोर आल्या आहेत. सनम तेरी कसम चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये मुख्य अभिनेता दुसरा कोणी नसून हर्षवर्धन राणे असणार आहे.

 

DEEPAK MUKUT ANNOUNCES ‘SANAM TERI KASAM 2’ WITH HARSHVARDHAN RANE… #DeepakMukut [Soham Rockstar Entertainment] announces Part 2 of #SanamTeriKasam… #HarshvardhanRane will star in the second part as well. #SanamTeriKasam2

Meanwhile, the first part will re-release in theatres… pic.twitter.com/refrsVghyb

— taran adarsh (@taran_adarsh) September 10, 2024

हे देखील वाचा- दीपिका-रणवीरच्या मुलीला पाहण्यासाठी मुकेश अंबानी हॉस्पिटलमध्ये पोहोचले, बाळाला भेटून दिला आशीर्वाद!

पहिला भाग पुन्हा प्रदर्शित होईल
या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये हर्षवर्धन राणे पुनरागमन करत असल्याने या चित्रपटाचा पहिला भाग या ऑक्टोबरमध्ये पुन्हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. ही बातमी चाहत्यांसाठी खूप आनंदाची ठरली आहे. मात्र, या घोषणेसोबतच ती दुसऱ्या भागाची मुख्य अभिनेत्री कोण असेल हे जाणून घेण्याचीही उत्सुकता आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात ‘सुरू’ची भूमिका करणाऱ्या मावरा होकानेचा मृत्यू दाखवण्यात आला आहे. ती एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे, त्यामुळे दुसऱ्या भागात तिचा समावेश होण्याची फारशी शक्यता नाही. ‘सनम तेरी कसम 2’ च्या कथानकाबद्दल सांगायचे तर हा एक म्युझिकल लव्हस्टोरी चित्रपट असणार आहे.

Web Title: The love story of inder and suru will return to the screen sanam teri kasam 2 announced by deepak mukut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2024 | 02:56 PM

Topics:  

  • Bollywood News

संबंधित बातम्या

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद
1

Controversies Films 2025: ‘बॅन’ ते एफआयआर आणि थिएटरमध्ये तोडफोड, जाणून घ्या कोणत्या चित्रपटांनी ओढवून घेतला वाद

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार
2

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार

The Bengal Files: ‘काश्मीरची परिस्थिती बंगालपेक्षा चांगली…’ ‘द बंगाल फाइल्स’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, पल्लवी जोशी संतापल्या!
3

The Bengal Files: ‘काश्मीरची परिस्थिती बंगालपेक्षा चांगली…’ ‘द बंगाल फाइल्स’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, पल्लवी जोशी संतापल्या!

‘बागी ४’ च्या सेटवर मोठी दुर्घटना; १२ फूटच्या उंचीवरून खाली पडले दोन कलाकार, रुग्णालयात दाखल
4

‘बागी ४’ च्या सेटवर मोठी दुर्घटना; १२ फूटच्या उंचीवरून खाली पडले दोन कलाकार, रुग्णालयात दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.