
Kedar Shinde on Drishyam 3 (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
केदार शिंदे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर दृश्यम 3 चा आणि दिवंगत दिग्दर्शक निशिकांत कामत यांचा एक फोटो शेअर केला. फोटोसोबत त्यांनी एक खूप मनापासून लिहिलेली पोस्ट टाकली.
केदार शिंदे यांनी पोस्टमध्ये लिहिलं, “नुकताच ‘दृश्यम ३’ पाहिला. त्याआगोदरचे दोन्ही भागही पाहिले होते. ओरिजनल लोकांच्या कल्पकतेला सलाामच!! पण हिंदित जे अद्वितीय यश मिळालं त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून कौतुक! सिनेमा बनवला जातो तो चालण्यासाठी! तिसरा भाग पाहिल्यावर प्रत्येक माणसाने माझी प्रतिक्रिया विचारली. एक खरं सांगू? याविषयी मला फार बोलावंसं वाटत नाही. जेव्हा लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो तेव्हा सगळच संपतं ! मुर्खपणा होईल त्याच्या विषयी बोलणं म्हणजे.. पण पण पण… या अभूतपूर्व प्रतिसादाचं मी पूर्ण क्रेडिट देईन ते… पहिल्या भागाच्या दिग्दर्शकाला. निशिकांत कामत नसता तर हे इमले ही लोकं बांधूच शकले नसते. एका मराठी माणसाने पाया रचला म्हणूनच पुढे कळस चढवले गेलेत!!”
‘दृश्यम 3 : द कन्क्लूजन’ हा या सिरीजचा शेवटचा भाग असल्याचे सांगितले जात आहे. यात पुन्हा एकदा अजय देवगण विजय साळगावकरच्या भूमिकेत आहे. त्याच्यासोबत तब्बू, श्रिया सरन, इशिता दत्ता, रजत कपूर, कमलेश सावंत, जयदीप अहलावत आणि मृणाल जाधव यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. पहिल्या दोन भागात जशी सस्पेन्सची पकड होती, तिसऱ्या भागात पण तीच पकड ठेवली आहे. शेवटपर्यंत काय होणार हे कळत नाही आणि हाच या सिनेमाचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे.
Drishyam 3 OTT Release: अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’च्या OTT रिलीजची तारीख ठरली? जाणून घ्या अपडेट
2 ऑक्टोबरला आल्यापासून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर एकामागून एक रेकॉर्ड तोडतोय.आता केदार शिंदे यांनी निशिकांत कामतची आठवण काढल्यामुळे पुन्हा एकदा पहिल्या दृश्यमची चर्चा सुरु झाली आहे. 2015 ला आलेला पहिला दृश्यम आजही लोक विसरलेले नाहीत. त्यावेळी निशिकांतने ज्या पद्धतीने गोष्ट सांगितली होती, तीच खरी या फ्रेंचायझीची ताकद आहे.
केदार शिंदे यांनी अगदी खरं सांगितलं, एखादा सिनेमा हिट होतो त्यामागे अनेक लोकांची मेहनत असते, पण पाया भक्कम असेल तरच इमारत उंच जाते आणि दृश्यमचा पाया निशिकांत कामतनेच घातला होता हे कोणीही विसरू शकत नाही.