(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
पलाश सेन हे एक प्रसिद्ध हिंदी पॉप आणि रॉक संगीतकार, गायक आणि संगीतकार आहेत. ते १९९८ मध्ये भारतीय पॉप-रॉक बँड युफोरिया ची स्थापना केली. या बँडने हिंदी संगीताच्या क्षेत्रात खास ठसा उमटवला आहे.पलाश सेन यांच्या करिअरमध्ये ८० पेक्षा अधिक गाणी आहेत आणि त्यातील अनेक गाणी आजही लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. ‘मायरी’, ‘धूम पिचक धूम’, त्यांची गाणी अजूनही खूप लोकप्रिय आहेत. आणी आजूनही लोकांना ती आवडतात. पलाश सेन केवळ एक गायकच नाही तर एक डॉक्टर देखील आहे. साल २०२५ मध्ये पलाश सेन यांची एकूण संपत्ती अंदाजे 100,000 ते 1 मिलियन म्हणजेच ८५ लाख ते ८ कोटी रुपये दरम्यान असल्याचे मानले जाते. त्यांच्या कमाईचे मुख्य स्रोत म्हणजे लाईव्ह शो, अल्बम्स आणि इतर विविध प्रोजेक्ट्स.पलाश सेनने पॉप म्युझिकला केवळ नवी ओळख दिली नाही, तर त्यांच्या कुटुंबासाठी सन्मान आणि आशीर्वादाची भावना देखील दाखवली आहे.
पलाश सेनचा संगीत पारंपरिक भारतीय सूर आणि आधुनिक पॉप-रॉकचा समिश्रण आहे. त्यांचे गाणे नेहमी सकारात्मक संदेश देणारे आणि सामाजिक मुद्द्यांवर आधारित असते. त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर गाणी गायली आहेत जी लोकांच्या मनाला भिडतात.पलाश सेन यांनी त्यांच्या संगीतासाठी अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त केले आहेत. फार कमी लोकांना माहिती आहे की पलाश त्यांच्या आईचे मंगळसूत्र घालून स्टेजवर सादरीकरण करतात, जे त्याच्या कुटुंबाबद्दलच्या त्यांच्या भावना आणि आदराचे प्रतीक आहे.
पलाश सेन यांच्या आयुष्यात आईचं स्थान अतिशय खास आहे. त्यांच्या आईचं नाव डॉ. पुष्पा सेन. फाळणीच्या काळात, फक्त ८ वर्षांची असताना, त्यांनी आपल्या धाकट्या भावाचा हात धरून दीर्घ आणि कठीण प्रवास केला. या संघर्षातून पुढे जाऊन त्यांनी स्वतःला डॉक्टर म्हणून सिद्ध केलं आणि समाजसेवेसाठी आयुष्य वाहिलं.
आदित्य बिरला ग्रुपचा ‘अल्का कलेक्शन’ लाँच! ‘दिल अभी भरा नही’च्या नव्या रुपातून सादर
ते आईचा आशीर्वाद म्हणून आईचे मंगळसूत्र घालतात
पलाश सांगतात की त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर, त्यांच्या आईने मंगळसूत्र काढून ठेवलं. काही काळानंतर पलाशने त्या मंगळसूत्राकडे पाहताना जाणवलं की “हे फक्त दागिनं नाही, तर त्यात एक आईचा संघर्ष, प्रेम, आणि आशीर्वाद दडलेला आहे.” त्यामुळे त्यांनी ठरवलं की, प्रत्येक लाईव्ह परफॉर्मन्समध्ये ते हे मंगळसूत्र घालतील. गाताना त्यांच्या गळ्यात ते असलं की, आईच्या आशीर्वादाचं अस्तित्व त्यांना प्रत्येक गाण्याच्या ओळीत आणि प्रत्येक सूरात जाणवतं