फोटो सौजन्य - Social Media
आदित्य बिरला ग्रुपच्या इंद्रिया ब्रँडने फेस्टिव्ह सीझनसाठी आपले नवीन ‘अल्का कलेक्शन’ लाँच केले आहे. या कलेक्शनचं सादरीकरण लोकप्रिय गाणं ‘दिल अभी भरा नही’च्या पुनर्निर्मित आवृत्तीतून करण्यात आलं आहे. या म्युझिक व्हिडिओमध्ये प्रथमच अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ एकत्र झळकले असून त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीतून आधुनिक प्रेमकथेचं सुंदर दर्शन घडतं.
या व्हिडिओला संगीतकार स्नेहा खानवलकर यांनी संगीत दिलं असून लेखन आणि दिग्दर्शन अन्विता दत्त यांचं आहे. सणासुदीच्या धामधुमीत एका जोडप्याने आपली भावना कशी व्यक्त केली जाते, जिव्हाळ्याची नाती कशी जपली जातात आणि छोट्या क्षणांमधून प्रेमाची कशी अनुभूती होते, याचा कोमल वेध या फिल्ममध्ये घेण्यात आला आहे.
या कलेक्शनची प्रेरणा संपत्ती व समृद्धीचा अधिपती मानल्या जाणाऱ्या कुबेराच्या अल्कापुरी या पौराणिक नगरीतून घेण्यात आली आहे. अल्का कलेक्शन सोने, हिरे आणि पोल्कीमध्ये साकारण्यात आले असून यामध्ये देखणे नेकलेस, कानातले आणि बांगड्यांचा समावेश आहे. कमळ, हंस आणि मोर यांसारख्या पौराणिक प्रतीकांवर आधारित डिझाइन्समधून उत्सव, सौंदर्य आणि वैभवाचे दर्शन घडते.
कॅम्पेनबाबत बोलताना इंद्रियाचे सीईओ संदीप कोहली म्हणाले, “ज्वेलरी ही केवळ अलंकार नसून नात्यांची जपणूक करणारे प्रतीक आहे. अदिती आणि सिद्धार्थ यांच्या खऱ्या केमिस्ट्रीमुळे आमचा संदेश अधिक प्रभावी झाला आहे.” तर सीएमओ शांतिस्वरुप पांडा यांनी सांगितले की, “अल्का कलेक्शन हे फेस्टिव्ह सीझनमधील समृद्धी आणि आपल्या प्रिय व्यक्तीबद्दलच्या प्रेमाचे प्रतीक आहे.”
सध्या इंद्रियाचे 15 शहरांमध्ये 29 शोरूम्स आहेत आणि 20,000 पेक्षा अधिक डिझाइन्सद्वारे ते ग्राहकांना आकर्षित करत आहेत. दैनंदिन वापरापासून ते ब्रायडल ज्वेलरीपर्यंत विविध डिझाइनमध्ये इंद्रियाचं खास कौशल्य आणि बारीकसारीक नक्षीकाम दिसून येतं. या फेस्टिव्ह सीझनमध्ये *‘दिल अभी भरा नही’*च्या माध्यमातून सादर केलेलं अल्का कलेक्शन ग्राहकांना चिरंतन प्रेमाची अनुभूती देणार आहे.