Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ab Hoga Hisab Season 2 चा ट्रेलर प्रदर्शित! प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद, अपेक्षेपेक्षाही लवकर दुसऱ्या सीझनसह परत

प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादानंतर 'अब होगा हिसाब' या लोकप्रिय रिव्हेंज ड्रामा सीरिजचा दुसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. पहिल्या सीझनचा शेवट जिथे झाला होता, तिथूनच कथा पुढे सरकणार असून बॉबीच्या बंटीच्या शोधाचा थरार अधिक तीव्र होणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 30, 2026 | 07:00 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिसादानंतर ॲमेझॉन एमएक्स प्लेअरने आपल्या लोकप्रिय ‘अब होगा हिसाब’ या रिव्हेंज ड्रामा सीरिजच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. पहिल्या सीझनला मिळालेल्या प्रचंड लोकप्रियतेमुळे अपेक्षेपेक्षाही लवकर दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, 3 जुलैपासून तो स्ट्रीम होणार आहे.

Extra Marital Affairs: एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या मुद्द्यावर रंगला वाद, राम कपूरचं वक्तव्य चर्चेत; आकांक्षाने केली कानउघाडणी

दुसऱ्या सीझनची कथा पहिल्या भागाच्या शेवटापासूनच पुढे सरकते. बंटीचा शोध घेण्यासाठी बॉबी कोणत्याही थराला जाण्याची तयारी ठेवतो. या प्रवासात त्याचा सामना प्रभावशाली आणि गूढ व्यक्तिमत्त्व असलेल्या गोल्डीशी होतो. गोल्डीचा विश्वास संपादन करण्याच्या प्रयत्नात अनेक धक्कादायक रहस्ये उलगडतात आणि संशय, विश्वासघात तसेच संघर्षामुळे कथानक अधिकच थरारक बनते. या सीरिजमध्ये शाहीर, संजय कपूर, मौनी रॉय, अविनाश मिश्रा, निम्रत कौर अहलुवालिया, हरमन सिंघा आणि आशीमा वर्दान यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. निर्मात्यांच्या मते, दुसऱ्या सीझनमध्ये अधिक गुंतागुंतीची कथा, मोठी आव्हाने आणि प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी अनेक अनपेक्षित वळणे पाहायला मिळणार आहेत.

ॲमेझॉन एमएक्स प्लेअरचे डायरेक्टर आणि कंटेंट प्रमुख अमोघ दुसाद यांनी सांगितले की, पहिल्या सीझनला मिळालेल्या प्रेमामुळे हा सीझन नियोजित वेळेपूर्वीच प्रेक्षकांसमोर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. देशभरातील प्रेक्षकांशी नाळ जोडणाऱ्या दर्जेदार कथा मोफत उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा प्रयत्न कायम राहील, असेही त्यांनी नमूद केले. मुख्य अभिनेता शाहीर याने दुसऱ्या सीझनमध्ये बॉबीच्या व्यक्तिरेखेचा अधिक आक्रमक आणि धोकादायक प्रवास पाहायला मिळणार असल्याचे सांगितले. तर संजय कपूर यांनी गोल्डीच्या व्यक्तिरेखेचे अनेक नवे पैलू या सीझनमध्ये उलगडतील, असे म्हटले. मौनी रॉय आणि निम्रत कौर अहलुवालिया यांनीही नव्या सीझनमध्ये प्रेक्षकांसाठी अनेक धक्कादायक आणि रोमांचक घडामोडी असतील, असा विश्वास व्यक्त केला.

Deool Band 2 : सिनेमाच्या कथेतही पत्नीचं योगदान! आधी ‘हा’ अभिनेता होता लीड हिरो, स्नेहल तरडेने कथाच बदलली

‘अब होगा हिसाब’ सीझन 2 हा 3 जुलैपासून केवळ ॲमेझॉन एमएक्स प्लेअरवर मोफत उपलब्ध होणार असून, तो मोबाइल, कनेक्टेड टीव्ही, ॲमेझॉन शॉपिंग ॲप, प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही, जिओटीव्ही आणि एअरटेल एक्सस्ट्रीम या प्लॅटफॉर्म्सवरही पाहता येणार आहे.

Web Title: Trailer for ab hoga hisab season 2 released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 07:00 PM

Topics:  

  • about web series
  • crime web series

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.