Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

The Viral Fever चा दबदबा कायम! ‘प्राइम व्हिडिओ प्रेझेंट्स’मध्ये 6 मोठे शोज आणि चित्रपटांची दमदार घोषणा

‘पंचायत 5’ पासून ‘एस्पिरंट्स 3’ पर्यंत ‘प्राइम व्हिडिओ प्रेझेंट्स’ भारतातील सर्वाधिक लोकप्रिय स्टोरीटेलिंग युनिव्हर्सच्या मोठ्या घोषणा करण्यात आले आहे. यामुळे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन होणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 20, 2026 | 03:30 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • The Viral Fever चा दबदबा कायम
  • ‘प्राइम व्हिडिओ प्रेझेंट्स’मध्ये 6 मोठे शोजची घोषणा
  • चित्रपटांची देखील केली घोषणा
 

डिजिटल मनोरंजनाच्या दुनियेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या The Viral Fever (TVF) ने पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध केली आहे. आकर्षक, वास्तवाशी जोडलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणाऱ्या कथांमुळे TVF आज भारतातील सर्वात लोकप्रिय कंटेंट क्रिएटर्सपैकी एक बनले आहे. ‘प्राइम व्हिडिओ प्रेझेंट्स’ या भव्य मंचावर TVF ने आपल्या आगामी प्रोजेक्ट्सची घोषणा करत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या इव्हेंटमध्ये अनेक प्रोडक्शन हाऊसेसने आपल्या आगामी प्रोजेक्ट्सची झलक सादर केली, मात्र सर्वाधिक शोज आणि चित्रपटांची घोषणा करून TVF नेच सर्वाधिक प्रभाव टाकला आहे. त्यांच्या लोकप्रिय फ्रँचायझींचे नवीन सीझन्स, नव्या संकल्पनांचे शोज आणि चित्रपटांसह त्यांनी एक दमदार कंटेंट लाइनअप सादर केला आहे.

केदार शिंदे यांचा नवा प्रयोग; लेकीसोबत घेऊन येणार ‘आई भाड्याने हवी?’ हा आगामी चित्रपट

TVF च्या घोषणांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला शो म्हणजे एस्पिरंट्स सीझन 3. UPSC परीक्षेच्या पार्श्वभूमीवर आधारित हा शो तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असून, नव्या सीझनमध्ये कथा आणखी उत्कंठावर्धक वळण घेईल अशी अपेक्षा आहे. यानंतर पंचायत सीझन 5 ची घोषणा झाली. ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित हा हलकाफुलका आणि भावनिक शो सर्व वयोगटातील प्रेक्षकांचा आवडता ठरला आहे.

तसेच, ‘ग्राम चिकित्सालय’ सीझन 2 चीही घोषणा करण्यात आली आहे. साध्या, विनोदी आणि वास्तववादी कथेमुळे या मालिकेला अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळाली. याशिवाय ‘सपने वर्सेस एव्हरीवन’ सीझन 2 आणि ‘संदीप भैया’ या लोकप्रिय स्पिन-ऑफचा सीझन 2 ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फक्त इतक्यावरच न थांबता, TVF ने दोन नवीन शोज ‘पिरामिड’ आणि ‘वंश’ यांचीही घोषणा करण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांच्या कंटेंट युनिव्हर्सचा विस्तार अधिकच वाढणार आहे.

अखेर प्रतीक्षा संपली, मिर्जापुर सीरीजच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, प्राइम वीडियोने जाहीर केली चित्रपटाची रिलीज डेट

वेब सिरीजसोबतच आता TVF चित्रपट क्षेत्रातही मोठं पाऊल टाकत आहे. ‘कॉलेज फेस्ट’ आणि Vvan या दोन चित्रपटांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ‘Vvan’साठी TVF ने बालाजी टेलिफिल्म्स सोबत भागीदारी केली आहे, जी इंडस्ट्रीतील दोन मोठ्या नावांची खास जोड ठरणार आहे. एकूणच, The Viral Fever ने ‘प्राइम व्हिडिओ प्रेझेंट्स’च्या मंचावर दमदार उपस्थिती दर्शवली आहे. इतक्या मोठ्या आणि वैविध्यपूर्ण घोषणांमुळे 2026 हे वर्ष TVF साठी आणि प्रेक्षकांसाठीही अत्यंत खास ठरणार आहे. मनोरंजनाची मेजवानी घेऊन येणाऱ्या या नव्या प्रोजेक्ट्सकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Tvf prime video presents 2026 big announcements aspirants panchayat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Prime Video

संबंधित बातम्या

K Bhagyaraj Passes Away : मनोरंजनविश्वात शोककळा! अभिनेते-दिग्दर्शक के. भाग्यराज यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन
1

K Bhagyaraj Passes Away : मनोरंजनविश्वात शोककळा! अभिनेते-दिग्दर्शक के. भाग्यराज यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन

भारतीय रंगभूमी आणि कलाविश्वासाठी नवे पर्व; आदित्य बिर्ला ग्रुपने सुरू केली ‘INT आदित्य बिर्ला परफॉर्मिंग आर्ट्स अकादमी’
2

भारतीय रंगभूमी आणि कलाविश्वासाठी नवे पर्व; आदित्य बिर्ला ग्रुपने सुरू केली ‘INT आदित्य बिर्ला परफॉर्मिंग आर्ट्स अकादमी’

‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त त्र्यंबकेश्वर येथे साकार होणार भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा अद्वितीय संगम
3

‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त त्र्यंबकेश्वर येथे साकार होणार भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा अद्वितीय संगम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.