
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
विकी आणि आलिया दोघांनीही काळ्या पोशाखात दिसले. पुरस्कार सोहळ्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघे एकत्र बसलेले दिसत आहेत. त्याच कार्यक्रमातील काही फोटोंमध्ये विकी आलियाला त्याच्या फोनवर काहीतरी दाखवताना दिसत आहे. आणि आलिया यावर चेहऱ्याची हावभाव करताना दिसली आहे. आलिया आणि विकी हसत देखील आहेत.
आलियाने छोट्या विकी कौशलला पाहिले?
सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये विकी आलियाला त्याच्या फोनवर काहीतरी दाखवताना दिसत आहे. आलियाच्या प्रतिक्रियेवरून हे स्पष्ट होते की विकी तिला त्याच्या मुलाचा फोटो दाखवत आहे. चाहते या फोटोवर कमेंट करत आहेत. आणि दोघांचा हा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
Vicky probably showing baby kaushal pics to Alia , this is so cute 😭
byu/Hell_holder11 inBollyBlindsNGossip
चाहत्यांनी पोस्टवर केला कंमेंटचा वर्षाव
चाहत्यांनी पोस्टवर दिल्या प्रतिक्रिया, एकाने लिहिले “विकी आलियाला बेबी कौशलचा फोटो दाखवत असेल. तो खूप गोंडस आहे.” दुसऱ्याने लिहिले: “अरे, आता सर्वांना मुले होत आहेत.” दुसऱ्याने लिहिले: “युनिवर्सल बेबी डॅड रूल: तुमच्या मुलांचे फोटो तुमच्या सहकाऱ्याला नेहमीच दाखवा.” परंतु, विकी किंवा आलियाने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे.
‘Chhava’ ला अखेर मिळाली बरोबरीची टक्कर, ‘Dhurandhar’ने सोमवारीही केला कहर; ११ दिवसात रचला इतिहास
विकी कौशल आणि कतरिना कैफ ७ नोव्हेंबर रोजी आई- बाबा झाले. अभिनेत्रीने एका मुलाला जन्म दिला आणि कुटुंबात छोट्या विकीचे या कपलने आनंदाने स्वागत केले. विकीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सर्वांना त्यांच्या मुलाच्या जन्माची माहिती दिली. विकी आणि कतरिनाचा मुलगा आता एक महिन्याचा आहे. त्यांनी अद्याप बाळाचे नाव किंवा बाळाची झलक चाहत्यांना दाखवलेली नाही. परंतु या दोघांचेही चाहते त्यांचा मुलाची झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत.