
Vicky Kaushal ने गाजवला ‘Zee Cine Awards’चा मंच
या भव्य सोहळ्यातील सर्वात लक्षवेधी क्षणांपैकी एक म्हणजे अभिनेता Vicky Kaushal चा दमदार परफॉर्मन्स. आपल्या प्रभावी अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या विकीने स्टेजवर एक भव्य सादरीकरण करत मराठा शौर्य आणि परंपरेला अनोख्या पद्धतीने आदरांजली अर्पण केली. त्यांच्या या सादरीकरणाने प्रेक्षकांना अक्षरशः थक्क केले.
“मला मानसिक त्रास झाला…”, Farah Khan ने Akshaye Khanna बद्दल केले मोठे विधान; वक्तव्य चर्चेत
विकी कौशलने आपल्या अलीकडील Chhaava या चित्रपटातील भूमिकेची झलक स्टेजवर सादर करत मराठा इतिहासातील शौर्यगाथा जिवंत केल्या. महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती आणि वीरतेचा गौरव दर्शवणारा हा परफॉर्मन्स पारंपरिक शैलीत सादर करण्यात आला.
या सादरीकरणाची सुरुवात विकीच्या भव्य एंट्रीने झाली. तो एका सजवलेल्या हत्तीवरून स्टेजकडे येताना दिसला. त्याच वेळी नाशिक ढोलाच्या गजरात आणि भगव्या झेंड्यांच्या लाटांमध्ये संपूर्ण वातावरण उत्साहाने भारावून गेले. या भव्य मिरवणुकीसारख्या प्रवेशाने कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट करत प्रतिसाद दिला.
मराठा परंपरेचा अभिमान जागवणाऱ्या या सादरीकरणात नृत्य, संगीत आणि पारंपरिक घटकांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. महाराष्ट्राच्या शौर्यगाथांना साजेसा हा परफॉर्मन्स प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला.
दरम्यान, अशा अनेक शानदार सादरीकरणांनी सजलेला ‘२४वा’ Zee Cine Awards २०२६ प्रेक्षकांना छोट्या पडद्यावरही पाहायला मिळणार आहे. हा विशेष कार्यक्रम रविवार, १५ मार्च रोजी सायंकाळी ७:३० वाजता Zee Cinema, Zee TV आणि ZEE5 वर प्रसारित होणार आहे.