
Palash Muchhal चे काळे कारस्थान उघड? (Photo Credit- X)
‘एचटी सिटी’ला दिलेल्या मुलाखतीत विद्यान माने याने पलाश आणि स्मृतीचे लग्न का मोडले, यावर भाष्य केले. विद्यान म्हणाला, “मी पलाश आणि स्मृतीच्या लग्नाच्या तयारीसाठी तिथे उपस्थित होतो. त्याच दरम्यान पलाश दुसऱ्या एका महिलेसोबत बेडवर रंगेहात पकडला गेला. ते दृश्य अतिशय धक्कादायक होते. हे पाहून संतापलेल्या स्मृती मानधनाच्या टीमने पलाश मुच्छलला जबर मारहाणही केली होती.”
🚨 Smriti Mandhana’s Friend Makes Shocking Claims: ‘Palash Muchhal Caught With Another Woman During Wedding, Beaten Up By Cricketers, and Cheated Him of ₹40 Lakh’ Smriti Mandhana’s childhood friend Vidnyan Mane, who claimed to be present at the wedding functions, has made a… pic.twitter.com/LdnzaRvGCO — Mention Cricket (@MentionCricket) January 23, 2026
विद्यान माने हा स्मृती मानधनाचा बालपणीचा मित्र असून तो पलाशसोबत एका चित्रपटात काम करत होता. त्याने आरोप केला की, पलाशच्या कुटुंबाने त्याची आर्थिक फसवणूक केली आहे. “पलाशची आई अमिता मुच्छल यांनी मला चित्रपटाचे बजेट वाढल्याचे सांगून १० लाख रुपये गुंतवण्यास भाग पाडले. पैसे न दिल्यास आधीचे पैसेही मिळणार नाहीत, अशी धमकी देऊन मला ब्लॅकमेल करण्यात आले,” असे विद्यानने सांगितले.
विद्यानच्या मते, पलाशचे संपूर्ण कुटुंबच फसवणूक करणारे आहे. जेव्हा त्याने या त्रासाबद्दल तक्रार दाखल केली आणि पलाशशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. “स्मृतीसोबतचे लग्न मोडल्यानंतर मुच्छल कुटुंबाने मला सोशल मीडियावर ब्लॉक केले,” असा दावाही त्याने केला आहे.
दुसरीकडे, पलाश मुच्छलने यापूर्वीच हे सर्व आरोप फेटाळले आहेत. त्याने म्हटले आहे की, “माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी हे खोटे आरोप केले जात आहेत. माझे वकील या प्रकरणावर योग्य ती कायदेशीर कारवाई करतील.”