(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सोमवारी संध्याकाळी कार अपघातानंतर अभिनेता विजय देवरकोंडा यांनी त्यांचे पहिले विधान जारी केले आहे. सोशल मीडियावर अनेक वृत्तांत फिरत होते ज्यात असे म्हटले होते की अभिनेता जोगुलंबा गडवाला जिल्ह्यातील उंडावल्लीजवळ अपघातात सामील होता. परंतु, अभिनेत्याने आता या घटनेचे स्पष्टीकरण दिले आहे. तो नक्की काय म्हणाला जाणून घेऊयात.
विजय देवरकोंडाने दिले स्पष्टीकरण
विजय देवरकोंडाने त्याच्या एक्स अकाउंटवर ट्विट करून कार अपघाताच्या वृत्तांवर स्पष्टीकरण दिले आहे. अभिनेत्याने म्हटले आहे की, “सर्व काही ठीक आहे. कार खराब झाली आहे, पण आम्ही सर्व ठीक आहोत.” त्यांनी असेही उघड केले की अपघातानंतर ते जिममध्ये गेलो होतो आणि स्ट्रेंथ वर्कआउट केले होते. त्यांनी पुढे लिहिले की, “आत्ताच घरी परतलो. मला डोकेदुखी आहे, पण बिर्याणी आणि झोप काही मदत करणार नाही. म्हणून, तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम. या बातमीने अस्वस्थ होऊ नका.”
All is well ❤️ Car took a hit, but we are all fine. Went and did a strength workout as well and just got back home. My head hurts but nothing a biryani and sleep will not fix. So biggest hugs and my love to all of you. Don’t let the news stress you 🤗❤️ — Vijay Deverakonda (@TheDeverakonda) October 6, 2025
पोलिसांनी कोणती माहिती दिली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “अभिनेता विजय देवरकोंडा सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पुट्टपर्तीहून हैदराबादला कारने जात असताना त्यांच्या समोरून येणारी एक बोलेरो कार अचानक उजवीकडे वळली. बोलेरोची उजवी बाजू विजयच्या कारच्या डाव्या बाजूला धडकली. परंतु, अपघातात कोणतीही दुखापत झाली नाही. विजय त्याच्या कारमध्ये इतर दोन प्रवाशांना घेऊन जात होता. ते लगेच दुसऱ्या वाहनात गेले. विजयच्या टीमने विम्यासाठी पोलिस तक्रार दाखल केली आहे.”
विजय देवरकोंडाच्या कामाच्या आघाडीवर
करिअरच्या आघाडीवर, विजय देवरकोंडाचा “किंगडम” हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. तसेच नुकतेच विजय आणि रश्मिका यांच्याबाबत, असे वृत्त समोर आले होते की त्यांनी ३ ऑक्टोबर रोजी त्यांच्या हैदराबाद येथे साखरपुडा केला आहे. या सोहळ्याला फक्त जवळच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. वृत्तानुसार, विजय आणि रश्मिका फेब्रुवारी २०२६ मध्ये लग्न करणार आहेत. त्यांचे लग्न डेस्टिनेशन वेडिंग असणार आहे. आता हे जोडपं कधी लग्न करणार याकडे चाहत्यांचा लक्ष आहे.