विजय देवरकोंडाच्या कारचा भीषण अपघात! (Photo Credit- X)
Vijay Deverakonda Car Accident: दक्षिण भारतीय अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) जोगुलांबा गडवाला जिल्ह्यातील उंडावल्लीजवळ झालेल्या एका कार अपघातात थोडक्यात बचावला आहेत. अभिनेत्याची लेक्सस कार अचानक उजवीकडे वळणाऱ्या एका बोलेरोला धडकल्यामुळे हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातावेळी विजय देवरकोंडा कारमध्ये होता, मात्र सुदैवाने त्याला कोणतीही गंभीर इजा झाली नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दुपारी ३ वाजताच्या सुमारास विजय देवरकोंडा पुट्टपर्तीहून हैदराबादला जात असताना त्यांच्या समोरील बोलेरो कार अचानक उजवीकडे वळली आणि त्यांच्या कारला धडकली.
🚨 Vijay Deverakonda’s Car in Minor Accident — All Safe A Lexus carrying Vijay Deverakonda and his family was involved in a small accident near Undavalli in Gadwal district after a Bolero reportedly took a sudden right turn. pic.twitter.com/bTyXyvNYrJ — Aristotle (@goLoko77) October 6, 2025
कारमध्ये विजय देवरकोंडा यांच्यासह इतर दोन लोक होते. सुदैवाने, कोणीही जखमी झाले नाही. केवळ अभिनेत्याच्या कारचे किरकोळ नुकसान झाले आहे. विजय देवरकोंडा यांनी ताबडतोब दुसरी कार घेऊन आपला प्रवास सुरू केला. त्यांच्या टीमने विम्यासाठी तातडीने पोलीस तक्रार दाखल केली आहे.
कार अपघाताच्या बातमीनंतर अभिनेता विजय देवरकोंडाचे पहिले रिएक्शन समोर आले आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना दिलासा देत लिहिले:
“सगळं ठीक आहे. कारला धडक बसली आहे, पण आम्ही सगळे सुखरूप आहोत. मी तर आता स्ट्रेंथ वर्कआऊटही केला आणि आता घरी परतलो आहे. थोडं डोके दुखत आहे, पण बिरयानी आणि शांत झोपेमुळे काही फरक पडणार नाही (सगळं ठीक होईल). त्यामुळे तुम्हा सगळ्यांवर खूप प्रेम! या बातमीने अजिबात काळजी करू नका. सर्व काही व्यवस्थित आहे.”
अभिनेत्याने स्वतःची प्रकृती ठीक असल्याचे स्पष्ट केल्यामुळे त्याचे चाहते आता निश्चिंत झाले आहेत.
All is well ❤️ Car took a hit, but we are all fine. Went and did a strength workout as well and just got back home. My head hurts but nothing a biryani and sleep will not fix. So biggest hugs and my love to all of you. Don’t let the news stress you 🤗❤️ — Vijay Deverakonda (@TheDeverakonda) October 6, 2025
अपघाताची ही बातमी अशा वेळी आली आहे, जेव्हा अवघ्या काही दिवसांपूर्वीच विजय देवरकोंडा चर्चेत होते. ३ ऑक्टोबर रोजी विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांचा साखरपुडा विजयच्या हैदराबाद येथील घरी गुप्तपणे पार पडला, अशा बातम्या समोर आल्या होत्या. या घटनेच्या आदल्या दिवशी (रविवारी) विजय देवरकोंडा यांनी त्यांच्या कुटुंबासह श्री सत्य साई बाबांच्या प्रशांती निलयम आश्रमाला भेट दिली होती. या अपघातानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली असली तरी, विजय देवरकोंडा पूर्णपणे सुरक्षित असल्याचे अधिकृत अहवालांनी स्पष्ट केले आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, अभिनेता विजय देवरकोंडाला शेवटचे ‘किंगडम’ या चित्रपटात पाहिल गेला. हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील रिलीज झाला. तर, दुसरीकडे अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच ‘थामा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत दिसणार आहे.