भारती सिंहच्या घरी येणार नवा पाहुणा (Photo Credit- X)
Bharti Singh Pregnancy: कॉमेडी क्वीन आणि प्रसिद्ध टीव्ही होस्ट भारती सिंग कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. दरम्यान, तिने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांसह एक गोड बातमी शेअर केली आहे. होय, भारती सिंग दुसऱ्यांदा आई होणार असून तिच्या घरी लवकरच एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. कॉमेडियनने स्वतः सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करून ही आनंदाची बातमी जाहीर केली, ज्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आणि सेलिब्रिटी मित्रांमध्ये आनंदाची लाट पसरली.
भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये भारती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे आणि तिच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आहे. हर्ष तिच्यासोबत उभा असून तोदेखील खूप आनंदी दिसत आहे.
या जोडप्याने “आम्ही पुन्हा गर्भवती आहोत” अशा आशयाचे कॅप्शन देत ही पोस्ट शेअर केली. कॅप्शन येताच सोशल मीडियावर लगेचच अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला.
चाहत्यांमध्ये दुप्पट आनंद; ‘छोट्या गोला’ला मिळणार भावंडांची साथ टीव्ही आणि चित्रपट उद्योगातील प्रत्येकजण तसेच चाहते भारती आणि हर्षला त्यांच्या पोस्टवर शुभेच्छा देत आहेत.
भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांना लक्ष्य नावाचा एक मुलगा आहे. आता ‘छोट्या लक्ष्यला’ भाऊ किंवा बहीण मिळणार असल्याच्या बातमीने चाहते अधिकच उत्साही झाले आहेत. एका चाहत्याने कमेंट केली, “भारती दीदी, हसत राहा, आता तुमचा आनंद दुप्पट झाला आहे.” तर दुसऱ्या वापरकर्त्याने ‘गोला’ला शुभेच्छा दिल्या.
कॉमेडी क्वीन भारती सिंगचे यशस्वी करिअर
भारती सिंगने तिच्या कारकिर्दीची सुरुवात स्टँड-अप कॉमेडियन म्हणून केली आणि तिच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांचे मन जिंकले. ती “द कपिल शर्मा शो”, “कॉमेडी नाईट्स बचाओ” आणि “हुनरबाज” सारख्या अनेक हिट टीव्ही शोचा भाग राहिली आहे. आता भारती तिच्या आयुष्याच्या आणखी एका सुंदर टप्प्यात प्रवेश करत आहे आणि तिचे चाहते तिच्या दुसऱ्या मुलाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.