(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता विजय देवरकोंडा कमालीचा चर्चेत आहे. नुकताच अभिनेत्याच्या ‘किंगडम’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. त्यासोबतच चित्रपटाच्या शुटिंगही सुरु झाले. आता चित्रपटाच्या चर्चेदरम्यान निर्मात्यांनी चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये ‘किंगडम’ चित्रपटाचे हिंदी शीर्षक दिसत आहे. ‘साम्राज्य’ नावाने हा चित्रपट हिंदी भाषिक प्रेक्षकांसाठी दाखल होणार आहे. या चित्रपटाची कथा आणि संपूर्ण स्टारकास्ट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे, पोस्टरवरील अभिनेता विजयचा जबरदस्त लूकने प्रेक्षकांचं लक्ष वेधले आहे.
निर्मात्यांनी नुकतेच शेअर केलेल्या पोस्टरने लक्ष वेधले आहे. ‘साम्राज्य’ चित्रपटाचे हे हिंदी शीर्षक प्रेक्षकांना खूप आवडले आहे. या पूर्वी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. ज्यामध्ये हिंदी भाषिक प्रेक्षकांना रणबीर कपूरचा आवाज ऐकू आला. यावरूनच समजून येत आहे की चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीला अभिनेता रणबीर कपूरने आवाज दिला आहे. तसेच पोस्टरमध्ये चित्रपटाची रिलीज डेट देखील दिसत आहे. हा चित्रपट येत्या ३१ जुलै पासून सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
हा चित्रपट एक अॅक्शन थ्रिलर आहे ज्याचे दिग्दर्शन “जर्सी” फेम दिग्दर्शक गौतम तिन्नानुरी यांनी केले आहे. विजय यात मुख्य भूमिका साकारत आहे, परंतु उर्वरित कलाकारांबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही. किंगडम हा चित्रपट सितारा एंटरटेनमेंट, श्रीकारा स्टुडिओ आणि फॉर्च्यून फॉर सिनेमा यांच्या बॅनरखाली प्रदर्शित होत आहे. त्याचे निर्माते नागा वामसी आणि साई सौजन्य आहेत.
सीएम स्टॅलिन यांचे भाऊ आणि अभिनेते एमके मुथू यांचे निधन, वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
काही काळापूर्वी “किंगडम” चा टीझर रिलीज झाला होता, ज्यामध्ये विजय एका शक्तिशाली अॅक्शन हिरोच्या भूमिकेत दिसला होता. पूर्वी तो रोमँटिक भूमिकांसाठी ओळखला जात असे पण आता त्याने एक मजबूत आणि धाडसी भूमिका साकारली आहे. हा टीझर युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. टीझरला अधिक खास बनवण्यासाठी निर्मात्यांनी ज्युनियर एनटीआर, सूर्या आणि रणबीर कपूर यांनी आपला आवाज दिला आहे. ज्युनियर एनटीआरने तेलुगूमध्ये, सूर्याने तमिळमध्ये आणि रणबीर कपूरने हिंदी टीझरमध्ये कथा सांगितली आहे. यामुळे हा चित्रपट सर्व भाषांमधील प्रेक्षकांसाठी खास बनला आहे. आधी हा चित्रपट २८ मार्च रोजी प्रदर्शित होणार होता, पण आता तो ३१ जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.