(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
चित्रपट निर्माती फराह खान सध्या तिच्या यूट्यूब व्लॉगमुळे चर्चेत आहे. दरम्यान, ती तिचा नवीन टॅलेंट शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे, ज्याची तिने अधिकृत घोषणा केली आहे. हा शो खूपच अनोखा असणार आहे, ज्याचे नाव ‘आंटी किसको बोला’ हे आहे. सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे फराह खानसोबत गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा देखील या शोमध्ये जज म्हणून दिसणार आहेत. सोशल मीडियावर या शो चा प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये दोघीनी खूप धमाल करताना दिसत आहेत.
फराह खानने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शोशी संबंधित एक व्हिडिओ पोस्ट करून शोबद्दल माहिती दिली, ज्यामध्ये साजिद खान आणि गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा तिच्यासोबत दिसत आहेत. तसेच फराह खानचा भाऊ आणि चित्रपट निर्माता साजिद खान देखील या शो मध्ये जजची जबाबदारी पार पडणार आहे.
Bigg Boss 19 : तानिया मित्तल लावली आग! कुनिका – गौरवमध्ये कडाक्याच भांडण सुरु, पहा Video
कोण कोण दिसणार शो मध्ये?
फराह खानसोबत, सुनीता आणि साजिद देखील या शोमध्ये दिसणार आहे. फराहने पोस्टमध्ये कॅप्शन लिहिले आहे की, “आमचा नवीन शो ‘आंटी किसको बोला’ उद्यापासून सुरू होत आहे, तोही माझ्या चॅनलवर. साजिद खान आणि सुनीता आहुजा यांचे खूप खूप आभार, जे जज म्हणून आले आणि प्रत्येक महिलेमध्ये लपलेली प्रतिभा बाहेर आणण्यास मदत केली.”
अभिनंदनाचा वर्षाव झाला सुरु
फराह खानने पोस्ट शेअर केल्यानंतर, इंडस्ट्रीतील मित्र आणि कलाकारांनी लगेच प्रतिक्रिया दिल्या आणि कमेंट सेक्शनमध्ये प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेकांनी हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट केल्या आहेत. मनीष पॉलने लिहिले, “फराह, मला हे खूप आवडले! छान काम, खूप खूप अभिनंदन!” दुसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली, “मी यासाठी खूप उत्साहित आहे.” एका वापरकर्त्याने फराहला तिच्या शेफ दिलीपबद्दल विचारले, “दिलीप कुठे आहे?” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “अभिनंदन मॅडम.”
Bal Karve: ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
फराह खान यांच्या कामाबद्दल
फराह खान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते, ती तिच्या यूट्यूब चॅनेलवर व्हीलॉग देखील बनवते आणि अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींच्या मुलाखती देखील घेते. यापूर्वी, तसेच अभिनेत्री इन्स्टाग्रामवर एक मजेदार व्हिडिओ देखील पोस्ट केला होता, ज्यामध्ये तिचा शेफ दिलीप ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ चित्रपटातील ‘बदली सी हवा है’ गाण्यावर नाचताना दिसला होता. हा शो शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने दिग्दर्शित केला आहे.