(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन झाले आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. ‘चिमणराव’ या मालिकेतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. त्यांची गुंड्याभाऊची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. अभिनय क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे.
१९७९ साली दूरदर्शन प्रसारित झालेल्या चिमणराव या मालिकेत त्यांनी गुंड्याभाऊची भूमिका साकारली होती. या भूमिकेने त्यांना मराठी इंडस्ट्रीमध्ये ओळख मिळवून दिली. त्यांना इंडस्ट्रीत गुंड्या भाऊ या नावानं ओळखलं जात असे. पुण्याचे इंजिनिअर ते अभिनेते असा त्यांचा प्रवास अविस्मरमीय होता. त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये विविध भूमिका साकारून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले.
Bal Karve: ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बाळ कर्वे यांचे खरे नाव ‘बाळकृष्ण’ हे होते, परंतु त्यांना सगळे बाळ या नावानं हात मारत असे. पुढेही याच नावाने त्यांना लोकं ओळखू लागले. रंगकर्मी विजया मेहता हे त्यांचे नाट्यक्षेत्रातील पहिले गुरू होते. अभिनेते बाळ कर्वे यांची चिमणराव ही भारतीय टेलिव्हिजनची पहिली मालिका होती. त्यानंतर त्यांनी ‘स्वामी’ मालिका केली, या मालिके त्यांनी गंगोबा तात्या ही भूमिका साकारली. हे पात्रं देखील प्रेक्षकांना खूप आवडले. ‘प्रीतीचं झुळझुळ पाणी वाऱ्याची मंजूळ गाणी’ हे त्यांच्यावर चित्रीत झालेलं गाणं आजही लोकप्रिय आहे. आणि हे गाणं प्रेक्षकांना अजूनही तितकेच आवडते.
अभिनेते बाळ कर्वे यांनी त्यांच्या कारकिर्दीत बन्याबापू 1978,लपंडाव 1993, गोडी गुलाबी 1991, चातक चांदणी 1992 हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट केले आहे. जे अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. तसेच, उंच माझा झोका, प्रपंच, महाश्वेता, राधा ही बावरी, वहिनीसाहेब यांसारख्या लोकप्रिय मालिकेतील बाळ कर्वे यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षक कधीच विसरू शकणार नाहीत. आज बाळ कर्वे हे आपल्यात नसले तरी त्यांच्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनात जिवंत राहणार आहे.