Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘खदान’ मध्ये उलगडणार रहस्यमय सत्य, कुठे रिलीज होणार वेबसीरीज ?

एक रहस्यमय गाव, गडद रहस्ये आणि एक भयानक भूतकाळ हे दाखवणारी एक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अली गोनी, करणवीर बोहरा आणि रेबेका आनंद दिसणार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 21, 2025 | 05:32 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

भारतातील आघाडीच्या डिजिटल मनोरंजन प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या हंगामा ओटीटी १९ मार्च २०२५ रोजी आणखी एक बहुप्रतिक्षित वेबसिरीज घेऊन आली आहे. “खदान” हंगामा ओटीटीवर प्रदर्शित झाली आहे. यात अली गोनीसह करणवीर बोहरा आणि रेबेका आनंद मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हंगामा ओटीटीवर प्रसारित झालेली ही मालिका एक रोमांचक थ्रिलर दिसते जी सस्पेन्स आणि अ‍ॅक्शन यांचं मिश्रण आहे.

Housefull 5: जॉन अब्राहमने का नाकारला ‘हाऊसफुल ५’? अभिनेत्याने कारण केले उघड!

भयानक भूतकाळाने पछाडलेल्या खाण गावात इन्स्पेक्टर वीर प्रताप सिंग (अली गोनी) शांततेच्या शोधात असतो, पण इथे येऊन तो एका वेगळ्याच पेचात फसला जातो. गावात एका संपूर्ण कुटुंबाची निर्घृण हत्या झाल्याचे आढळून येते, ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात. या हत्येचा सूड घेण्यासाठी आत्मा परत आली आहे का? गावाला दीर्घकाळापासून असलेला शाप पुन्हा लागला आहे का? तपासादरम्यान सापडलेल्या शेकडो मृतदेहांमागे कोण आहे? वीर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोध असतो. याचदरम्यान तो रहस्य आणि फसवणुकीच्या जाळ्यात खोलवर ओढला जातो. प्रत्येक रहस्य उलगडताना दंतकथा आणि वास्तव यांच्यातील रेषा पुसट होत जातात, ज्यामुळे एक सत्य समोर येते जे त्याच्या दृढनिश्चयाची परीक्षा घेते आणि ज्यामुळे त्याच्या आयुष्याचा मार्ग कायमचा बदलतो.

हंगामा डिजिटल मीडियाचे सीईओ सिद्धार्थ रॉय म्हणाले ,“’खदान’ लाँच करून, आम्ही हंगामा ओटीटीवर मूळ कंटेंटसाठी एक नवीन बेंचमार्क स्थापित करत आहोत. ही आकर्षक थ्रिलर आमच्या प्रेक्षकांना रोमांचित करणारी, गुंतवून ठेवणारी आणि मोहित करणारी आहे. हंगामावर, आम्ही नाविन्यपूर्ण आणि अद्वितीय मनोरंजनाचा अनुभव प्रेक्षकांना देण्यासाठी वचनबद्ध आहोत.”

अली गोनी त्यांच्या भूमिकेबद्दल बोलताना मूळ मालिकेत काम करण्याचा त्यांचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, “खदानमध्ये वीर प्रताप सिंगची भूमिका साकारणे खरोखरच खास आणि माझ्या हृदयाच्या जवळ आहे. या भूमिकेमुळे मी मला माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून हॉरर-थ्रिलर शैलीची भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला आहे, अशा पद्धतीची भूमिका मी याआधी कधीही साकारली नव्हती. हा सिरीज खरोखरच आकर्षक आहे. मला पटकथा वाचण्यापासून ते शूटिंगपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया खूप आवडली. ही, कथा नक्कीच गुंतवून ठेवणारी असून मला आशा आहे की प्रेक्षकांना ही मालिका नक्कीच आवडेल”.

Sairat Re- Re-released: ९ वर्षांनी ‘सैराट’ प्रेक्षकांच्या भेटीला; परश्या म्हणाला, “‘सैराट’मुळे आमच्या आयुष्याला…”

तसेच, खदानमधील भूमिकेबद्दल बोलताना करणवीर बोहरा म्हणाले, अशा प्रकारची भूमिका पडद्यावर साकारणे खरंच आव्हानात्मक असते, आणि मला ते आवडते. खदानमध्ये एका कथेत अनेक परस्पर कथा विणलेल्या आहेत. प्रत्येकाचा स्वत:चा संघर्ष आणि भूतकाळातील नकारात्मक अनुभव आहेत. प्रत्येक पात्र या प्रवासात स्वतःचे सत्य शोधण्यासाठी त्यांच्या समोर येणाऱ्या अडथळ्यांवर कशी मात करतात हे पाहण्यास प्रेक्षक नक्कीच उत्सुक असतील. या टीमसोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता आणि मला आशा आहे की प्रेक्षक आम्ही केलेल्या मेहनतीचे कौतुक करतील,” असे ही अभिनेता पुढे म्हणाला.

प्रज्ञाची भूमिका साकारणारी रेबेका आनंद म्हणाल्या, “खदान कपट याने भरलेला एक चक्रव्यूह आहे, यात भूतकाळातील न सुटलेले संघर्ष आहेत. वीर आणि प्रज्ञा हे रहस्यमय गाव उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत. वेबसिरीज जस जशी पुढे जाईल तशी प्रेक्षकांना एका रंजक वळणावर प्रज्ञाचे वेगवेगळे पैलू पाहायला मिळतील आणि प्रेक्षकांना ते नक्कीच खिळवून ठेवतील.” १९ मार्च २०२५ रोजी हंगामा ओटीटी वर प्रदर्शित होणारा ‘खादान’ हा शो प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. ही मालिका आता हंगामा आणि टाटा प्ले बिंज, वॉचो, बीएसएनएल, प्लेबॉक्सटीव्ही, रेलवायर ब्रॉडबँड, एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले आणि डोर टीव्ही यासारख्या भागीदार प्लॅटफॉर्मवर केवळ स्ट्रीम होत आहे.

Web Title: Watch khadaan on hungama ott the truth watch khadaan only on hungama ott

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 05:07 PM

Topics:  

  • entertainment
  • OTT platform
  • OTT Release

संबंधित बातम्या

Superman OTT Release: प्रतीक्षा संपली! आता घरबसल्या पाहा सर्वात मोठ्या सुपरहिरोचा ५२४० कोटींचा चित्रपट, जाणून घ्या कधी आणि कुठे
1

Superman OTT Release: प्रतीक्षा संपली! आता घरबसल्या पाहा सर्वात मोठ्या सुपरहिरोचा ५२४० कोटींचा चित्रपट, जाणून घ्या कधी आणि कुठे

ब्लॉकबस्टर चित्रपट ‘महावतार नरसिंह’ २०२६ च्या ऑस्करसाठी नामांकित, ३४ चित्रपटांमधून निवड
2

ब्लॉकबस्टर चित्रपट ‘महावतार नरसिंह’ २०२६ च्या ऑस्करसाठी नामांकित, ३४ चित्रपटांमधून निवड

‘कंडोम खरेदी करताना कचरतात…’ नॅशनल शोमध्ये हे काय बोलून गेली सोनाक्षी सिन्हा? VIDEO VIRAL
3

‘कंडोम खरेदी करताना कचरतात…’ नॅशनल शोमध्ये हे काय बोलून गेली सोनाक्षी सिन्हा? VIDEO VIRAL

‘ही मॅन’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ‘जय- वीरू’ पुन्हा झळकणार पडद्यावर; ‘Sholay’ होणार री- रिलीज
4

‘ही मॅन’च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! ‘जय- वीरू’ पुन्हा झळकणार पडद्यावर; ‘Sholay’ होणार री- रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.