
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
“धुरंधर” या भारतीय चित्रपटाबाबत पाकिस्तानातील कराची येथील जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जात चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता आणि इतर टीम सदस्यांविरुद्ध खटला दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. हा चित्रपट सिनेमागृहात चांगली कमाई करत असतानाही अडचणीत अडकला आहे. आता पुढे हा चित्रपट किती कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
“धुरंधर” मुळे पाकिस्तानात भडका
अर्जदार मोहम्मद आमिर हा पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चा सदस्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्याने आरोप केला आहे की चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पीपीपीला दहशतवाद्यांना सहानुभूती देणारे म्हणून दाखवण्यात आले आहे. तसेच, कराचीतील ल्यारी परिसराचे वर्णन “दहशतवादी युद्धक्षेत्र” म्हणून केले गेले आहे, जे खोटे आणि चिथावणीखोर आहे.
पाकिस्तान धुरंधरला का घाबरतो?
या अर्जात असेही म्हटले आहे की, चित्रपटात कायदेशीर परवानगीशिवाय माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो, पीपीपीचा ध्वज आणि रॅलीच्या दृश्यांचा वापर करण्यात आला आहे. “धुरंधर” हा चित्रपट आखाती देशांमध्ये बंदी घालण्यात आला आहे. “धुरंधर” हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरात चांगला व्यवसाय करत आहे. परंतु, आखाती देशांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. बहरीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि युएईमधून “धुरंधर” ला प्रदर्शनाची परवानगी नाकारण्यात आली आहे. आखाती देशांनी यापूर्वी अनेक वेळा पाकिस्तानी थीम असलेल्या चित्रपटांवर बंदी घातली आहे.