
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अभिनेत्री मलायका अरोरा अलीकडेच आपल्या जुन्या रिलेशनशिपबद्दल बोलली आहे. यावेळी ती भावूक झाल्याचे पाहायला मिळालं. तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती दुसऱ्यांदा लग्न करणार का? याविषयी खुलासा केला आहे.तिने अरबाज खानचं नाव न घेता पहिल्या लग्नाच्या वेळेस तिच्याकडून काय चूक झाली, याबद्दल मनमोकळं सांगितलं आहे.
पिंकविलाच्या एका मुलाखतीत मलायका अरोराने १६ वर्षांपूर्वीच्या आपल्या रिलेशनशिपच्या दिवसांची आठवण केली आणि आजच्या तरुणांना सल्ला दिला. मलायकाने सांगितले,
“तरुण मुलींनी लग्नापूर्वी थोडा वेळ घ्यावा. मला समजत नाही, मुलींना इतक्या लवकर लग्न करण्याची घाई का असते, त्याची गरज नाही. आयुष्य थोडं समजून घ्या, आधी काहीतरी काम करा, आणि मग हा निर्णय घ्या. माझं खूप कमी वयात लग्न झालं होतं, त्यामुळे तुमचा वेळ घेऊन लग्न करा.”नंतर पुन्हा लग्न करण्याच्या निर्णयाबाबत विचारले असता, मलायका म्हणाली,'”कधीही काही होऊ शकतं. मी खूप रोमँटिक आहे. मला प्रेमावर विश्वास आहे. प्रेमाच्या प्रत्येक गोष्टीबद्दल माझा दृढ विश्वास आहे. त्यामुळे कधीही काही होऊ शकतं.”
अशा प्रकारे मलायकाने पुन्हा लग्न करणार यावर नकार दिला नाही आणि होकारही दिला नाही.मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी 1998 मध्ये लग्न केले. त्या काळात मलायका बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत होती, परंतु तिने आपल करियर बाजूला ठेवून कुटुंबाला प्राधान्य दिले. हे जोडपे बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट जोडप्यांपैकी एक मानले जात होते, पण लग्नानंतर 19 वर्षांनी, 2017 मध्ये, मलायकाने अरबाजकडून घटस्फोट घेतला.त्यांना अरहान खान नावाचा मुलगा आहे. अरबाजसोबत घटस्फोटानंतर ती अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती, परंतु काही महिन्यांपूर्वी दोघांचा ब्रेकअप झाला.