(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय शो ‘बिग बॉस १९’ ची आज, २४ ऑगस्टपासून धमाकेदार सुरुवात होणार आहे. या शोची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चाहते हा शो पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. यंदा निर्मात्यांनी पहिल्याच दिवशी एक मोठा ट्विस्ट प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे, ज्यामुळे प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले आहेत. यावर्षीचा विजेता पहिल्याच दिवशी जाहीर होणार असल्याचे समजले आहे. होय, स्वतःच सलमान खान ही घोषणा करणार आहे. तसेच आता Bigg Boss 19 च्या घरात नक्की काय घडणार आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.
‘हैवन’, ‘हेरा फेरी ३’ आणि ‘या’ चित्रपटांनंतर प्रियदर्शन घेणार रिटायरमेंट, म्हणाले ‘मी थकलोय…’
पहिल्याच दिवशी ‘विजेता’ घोषित
‘बिग बॉस’च्या आजवरच्या इतिहासात विजेता निवडण्यासाठी १०० दिवसांचा प्रवास असतो. पण यंदाच्या सिझनमध्ये एन्ट्रीसाठीच दोन स्पर्धकांमध्ये स्पर्धा होणार असल्याचे समजले आहे. युट्युबर मृदुल तिवारी आणि अभिनेत्री शहनाज गिलचा भाऊ शहबाज बदेशा यांच्यात ही लढत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांच्या व्होटिंगच्या आधारे या दोघांपैकी एकाला ‘विजेता’ म्हणून घोषित करून थेट ‘बिग बॉस १९’च्या घरात एन्ट्री दिली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या व्होटिंगमध्ये मृदुल तिवारीने बाजी मारली आहे आणि तो शोमध्ये प्रवेश करणार आहे. याचा अर्थ, ‘बिग बॉस १९’ ला पहिल्याच दिवशी घरातील पहिला विजेता मिळणार आहे. अर्थात, शोचा खरा विजेता शोधण्यासाठी अजून पाच महिन्यांचा प्रवास बाकी आहे. कारण यंदाचा सिझन तीन महिन्याऐवजी पाच महिन्यांचा असणार आहे. यामुळे चाहते हा शो पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
Bigg Boss 19 करणार धमाका! सलमानच्या शोमुळे ‘या’ ५ मालिकेच्या TRP मध्ये झाली घसरण?
कोण कोण आहेत यंदाचे स्पर्धक?
यंदा ‘बिग बॉस १९’च्या घरात अनेक सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर्सचा समावेश आहे. त्यांच्यामुळे शोमध्ये भरपूर ड्रामा आणि मनोरंजन पाहायला मिळेल. यामध्ये गौरव खन्ना, अमाल मलिक, आवेझ दरबार, तान्या मित्तल, अतुल किशन, कुनिका सदानंद, प्रणित मोरे, नीलम गिरी, जीशान कादरी, बसीर अली, नेहल चुजासमा, अभिषेक बजाज, नगमा मिराजकर आणि अशनूर कौर यांचा समावेश आहे.