
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
युवा सम्राट नागा चैतन्य आणि कार्तिक दांडू यांचा आगामी चित्रपट ‘NC24’ हा एक पौराणिक थ्रिलर चित्रपट आहे. ‘वाराणसी’ स्टार महेश बाबू यांनी चाय अक्किनेनी उर्फ नागा चैतन्य यांच्या वाढदिवसानिमित्त ‘NC24’ चे शीर्षक आणि फर्स्ट लूक पोस्टर रिलीज केले आहे. हा पोस्ट पाहून चाहते देखील चित्रपटासाठी आणखी उत्साहित झाले आहे.
‘द केरळ स्टोरी’ फेम अदा शर्माच्या आजीचे निधन, अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर
चित्रपटाचे शीर्षक केले जाहीर
चित्रपटाचे अधिकृत शीर्षक (NC24) ‘वृषकर्मा’ हे आहे. पहिल्या पोस्टरमध्ये नागा चैतन्य अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. चित्रपटाची रिलीज तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी, चाहत्यांना चित्रपटातील सुपरस्टार नागाचा पहिला लूक खूप आवडला आहे. चित्रपट निर्मात्यांनी इन्स्टाग्रामवर ‘NC24’ चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि शीर्षक जाहीर केले आहे. निर्मात्यांनी पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “#NC24 म्हणजे – वृषकर्मा. हा एक पौराणिक थ्रिलर चित्रपट आहे.” निर्मात्यांनी पुढे नागा चैतन्यला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि लिहिले, “वाढदिवसाच्या शुभेच्छा, युवा सम्राट @chayakkineni.”
महेश बाबूने NC24 चे शीर्षक केले जाहीर
अलीकडेच, NC24 च्या निर्मात्यांनी इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर आणि शीर्षक जाहीर केले. निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “धमाकेसाठी तयार रहा! सुपरस्टार @urstrulyMahesh उद्या सकाळी १०:०८ वाजता @chayakkineni #NC24 सोबत युवासम्राटचे शीर्षक आणि फर्स्ट लूक पोस्टर डिजिटली लाँच करणार आहेत. #SSMBforYUVASAMRAT #HBDYuvasamratNagaChaitanya.” असे लिहून ही पोस्ट शेअर केली आहे. वचन दिल्याप्रमाणे, चित्रपट निर्मात्यांनी NC24 चे शीर्षक जाहीर करून चाहत्यांना आनंदित केले.
नागा चैतन्यचा आज ३९ वा वाढदिवस
साउथ अभिनेता अक्किनेनी नागा चैतन्यचा जन्म २३ नोव्हेंबर १९८६ रोजी हैदराबाद येथे झाला. नागा आज त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. नागा चैतन्याला चित्रपटांमधील त्याच्या कामासाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत, ज्यात फिल्मफेअर साऊथ पुरस्कार, नंदी पुरस्कार आणि SIIMA पुरस्कार यांचा समावेश आहे.अभिनेत्याचा चाहता वर्ग देखील जास्त आहे.
वृषकर्मा चित्रपटाबद्दल
नागा चैतन्य व्यतिरिक्त, मीनाक्षी चौधरी देखील या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘लापता लेडीज’ अभिनेता स्पर्श श्रीवास्तव खलनायकाची भूमिका साकारत आहेत. १२० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाची निर्मिती बीव्हीएसएन प्रसाद आणि सुकुमार यांनी केली आहे. अजनीश लोकनाथ यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे.