
चहलच्या आयुष्यात पुन्हा वादळ? आरजे महवशसोबतची मैत्री संपली? (photo Credit- X)
युझवेंद्र चहलने त्याची पत्नी धनश्री वर्मा हिला घटस्फोट दिल्यानंतर आरजे महवशसोबतचे त्याचे नाव वारंवार जोडले गेले. या दोघांची मैत्री इतकी घट्ट होती की, चाहत्यांनी त्यांच्या डेटिंगबद्दलचे तर्क लढवण्यास सुरुवात केली होती. आरजे महवशने अनेक मुलाखतींमध्ये युझवेंद्रला आपला ‘बेस्ट फ्रेंड’ म्हटले होते आणि त्याच्या स्वभावाचे भरभरून कौतुकही केले होते. अनेकदा ते सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसल्याने त्यांच्या प्रेमाच्या अफवांना उधाण आले होते.
गेल्या वर्षी, २०२५ मध्ये एका लोकप्रिय पॉडकास्टमध्ये युझवेंद्र चहलने या नात्यावर उघडपणे भाष्य केले होते. तो म्हणाला होता की, लोकांना एखाद्यासोबत पाहिले की लगेच नात्याचे लेबल लावण्याची सवय असते. माझ्या कठीण काळात महवशने मला खंबीर साथ दिली, पण दुर्दैवाने लोकांनी तिला ‘घर तोडणारी’ म्हणून हिणवले आणि तिच्याबद्दल वाईट गोष्टी बोलल्या. तिने आणि मी वेळोवेळी आमची भूमिका स्पष्ट केली आहे, पण तरीही ट्रोलिंग थांबले नाही.
Rj Mahvash सोबत समय रैनाने उडवल्ली धनश्रीची खिल्ली, युजवेंद्र चहलची मजेदार प्रतिक्रिया व्हायरल
आरजे महवशवर अनेकदा असा आरोप करण्यात आला की, तिने स्वतःच्या करिअरचा फायदा करून घेण्यासाठी युझवेंद्र चहलच्या लोकप्रियतेचा वापर केला. मात्र, महवशने या आरोपांचा सडेतोड समाचार घेतला होता. तिने नेहमीच चहलच्या क्रिकेटमधील कामगिरीचे कौतुक केले आणि ती त्याची केवळ एक हितचिंतक असल्याचे सांगितले. मात्र, सततचे ट्रोलिंग आणि वैयक्तिक कारणांमुळे त्यांच्या मैत्रीवर ताण आल्याचे दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीपर्यंत एकमेकांच्या पोस्टवर कमेंट्स करणारे चहल आणि महवश आता एकमेकांच्या फ्रेंड लिस्टमध्ये नाहीत. दोघांनीही एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्यामुळे त्यांच्यात मोठा वाद झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या अनफॉलो करण्यामागील अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही, परंतु त्यांच्या पक्क्या मैत्रीत आता मोठा दुरावा आल्याचे स्पष्ट झाले आहे. एकेकाळी कठीण काळात एकमेकांच्या पाठीशी उभे राहणारे हे दोन मित्र आता पुन्हा एकत्र येणार की ही मैत्री कायमची संपली, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.