फोटो सौजन्य - Instagram
भारताचा फिरकीपट्टू युजवेंद्र चहल मागील अनेक वर्षांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सातत्याने चर्चेत आहे. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोट झाल्यानंतर दोघांच्या वेगळे झाल्याच्या चर्चाना मागील अनेक महिन्यांपासून उधाण आले होते. मागील बरेच महिने युजवेंद्र चहल याला भारतीय संघामध्ये देखील खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याला विश्वचषकामध्ये स्थान मिळाले होते पण त्याला प्लेइंग 11 मध्ये घेतले नाही. आता भारताचा कॉमेडियन समय आणि चहलची मैत्रीण आरजे महवश यांचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. भारताचा कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
आरजे महवशसह समयने युजवेंद्र चहलची माजी पत्नी धनश्री वर्मावर टीका केली. समय रैना आणि आरजे महवशचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, युजवेंद्र चहलची मजेदार प्रतिक्रिया देखील व्हायरल होत आहे. समयने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर चहलची प्रतिक्रिया शेअर केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, समयने धनश्री वर्माच्या घटस्फोटापासून ते “राईज अँड फॉल” शोपर्यंत सर्व गोष्टींचा उल्लेख केला आहे. चला तुम्हाला संपूर्ण प्रकरणाबद्दल सविस्तरपणे सांगूया.
समय रैना आणि आरजे महवश एका कॉस्मेटिक ब्रँडच्या मजेदार जाहिरातीत एकत्र दिसले. जाहिरातीदरम्यान, समयने आरजे महवशसमोर धनश्री वर्माच्या घटस्फोटावर टीका केली. जरी समय किंवा आरजे महवशने धनश्री वर्माचे नाव घेतले नसले तरी, त्यांच्या शब्दांवरून स्पष्ट होते की ते तिला उद्देशून बोलत होते. समयने प्रथम तिच्या उदय आणि पतनाचा उल्लेख करून खोड काढली.
Yuzi Chahal Comment on RJ Mahvash Post 💀😭 : pic.twitter.com/Ph0QE9CaAq — Incognito Cricket (@Incognitocric) October 3, 2025
समय म्हणाला, “माझा उदय आणि अस्त दोन महिन्यांत झाला.” धनश्रीने राईज अँड फॉलवरील अलिकडेच केलेल्या टिप्पणीचा हा संदर्भ होता. धनश्रीने लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांनंतर चहलने तिची फसवणूक केल्याचे म्हटले होते. त्यानंतर समयने धनश्रीचे नाव न घेता घटस्फोटाची चर्चा केली. त्याने ४.७५ कोटी रुपयांच्या पोटगीचाही उल्लेख केला आणि जाहिरातीत युजवेंद्र चहलचा “बी युअर ओन शुगर डॅडी” टी-शर्ट दाखवताना दिसत आहे. तथापि, जाहिरातीदरम्यान एकदाही समेने धनश्री किंवा युजवेंद्र चहलचे नाव घेतले नाही.
या जाहिरातीनंतर, समयने युजवेंद्र चहलसोबतच्या व्हिडिओ कॉलचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला. हा स्क्रीनशॉट जाहिरातीच्या शूटनंतर घेण्यात आला होता. युजवेंद्र चहलने हा स्क्रीनशॉट शेअर केला आणि समयला टॅग करत म्हटले, “दुसऱ्या केससाठी तयार राहा.” युजवेंद्र आणि समय यांच्यातील बंध प्रेक्षकांना खूप आवडला आहे.