'बॉर्डर २'च्या शुटिंगला पुण्यात सुरुवात, निर्मात्यांनी शेअर केला सेटवरील फोटो
बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चांगलाच चर्चेत आहे. अभिनेता शेवटचा ‘जाट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटामध्ये अभिनेत्याने अफलातून ॲक्शन भूमिका केल्या होत्या. या चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे कमाई केलेली नाही. रिलीजच्या काही दिवसांनंतरच चित्रपटाच्या सीक्वेलचीही घोषणा केली होती. त्यानंतर आता अभिनेता त्याच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे.
सध्या अभिनेता सनी देओल त्याचं संपूर्ण लक्ष ‘बॉर्डर २’ चित्रपटावर ठेवून आहे. सध्या चित्रपटाची शुटिंग सुरु असून तिसऱ्या शेड्युल्डचं शुटिंग पुण्यात सुरु आहे. पुण्यातल्या खडकवासलामधील एनडीएमध्ये शुटिंग सुरु आहे. शुटिंग दरम्यानचे काही फोटोज् सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘बॉर्डर २’ च्या कलाकारांचा शुटिंग सेटवरील ग्रुप फोटो समोर आला आहे. मंगळवारी (१७ जून), ‘बॉर्डर २’ च्या निर्मात्यांनी सनी देओल, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ यांच्यासोबत इतर कलाकारांचा ग्रुप फोटो शेअर केला. ‘बॉर्डर २’ची संपूर्ण टीममध्ये सनी देओल, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांचा समावेश आहे, पुण्यात ‘बॉर्डर २’ चित्रपटाच्या तिसऱ्या शेड्युल्डच्या शुटिंगला सुरुवात करण्यासाठी ही टीम जमली आहे. टीमचा पहिला फोटो मंगळवारी अर्थात आजच शेअर करण्यात आला आहे, जो पाहून चाहते खूपच उत्सुक झाले आहेत.
ATM चोरीचा आरोप, घोटाळ्यांची रेलचेल अन् तीन गुंडांची एन्ट्री; ‘ऑल इज वेल’चा कॉमेडी ट्रेलर एकदा बघाच
सनी देओलने शेअर केलेल्या फोटोमध्ये, वरुण धवन त्याच्या ‘बॉर्डर २’ मधल्याच लूकमध्ये दिसत आहे. त्याच्यासोबत लेजेंडरी सनी देओलही बसलेला दिसत आहे. अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझदेखील फोटोमध्ये पोज देताना दिसत आहेत. याशिवाय या फोटोमध्ये भूषण कुमारदेखील दिसत आहेत. तसेच चित्रपटाचे इतर निर्मातही कलाकारांसोबत फोटोमध्ये दिसत आहेत. फोटोच्या कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे, “बॉर्डर २’ चित्रपटाच्या तिसऱ्या शेड्यूलचे शूटिंग पुण्यातील प्रतिष्ठित राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये सुरू झाले आहे. दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी आता सनी देओल आणि वरुण धवनबरोबर शौर्य आणि एकतेची एक भव्य कहाणी पडद्यावर आणण्यासाठी एकत्र येतील. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग करत आहेत आणि भूषण कुमार, कृष्ण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता यांनी निर्मिती केली आहे. ‘बॉर्डर २’ २३ जानेवारी २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल, जो प्रजासत्ताक दिनाच्या आठवड्याच्या शेवटी येईल.”
उर्वशी रौतेला आणि सोनू सूद यांची ED ने का केली चौकशी, काय आहे संपूर्ण प्रकरण?
१९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर’ चित्रपटाची कथा १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित होता. त्यात सनी, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. अहानचे वडील सुनील शेट्टी यांनी या चित्रपटात बीएसएफचे असिस्टंट कमांडंट भैरों सिंग यांची भूमिका केली होती.