Vivek Agnihotri Commented On Deepika Padukone Appearance At The Jnu Says She Was Misled By Her Pr
२०१९ साली रिलीज झालेला ‘छपाक’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी दीपिका दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठामध्ये (जेएनयू) गेली होती आणि तिथे जाऊन ती त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाली होती. आता या प्रकरणावर प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शुभंकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्री म्हणाले की, “मी गॅरंटीने सांगू शकतो की, दीपिका जेएनयूमध्ये गेली होती. ती जेव्हा तिथे गेली, पण तिला तिथल्या जेएनयूच्या राजकारणाबद्दल माहिती नव्हतं.” दीपिका मुर्ख आहे, असं तुम्ही म्हणायचा प्रयत्न करत आहात का ? या प्रश्नावर विवेक म्हणाले की, “ही काही मुर्ख असण्याची किंवा नसण्याची गोष्ट नाही. प्रमोशन दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने तिला सांगितले असेल की, तिच्या चित्रपटाचे हे पब्लिसिटी करण्याचे उत्तम ठिकाण असेल. कदाचित दीपिकाला माहिती नसावं की, तो विषय किती संवेदनशील आहे, नाहीतर ती तिथे केव्हाच गेली नसती.”
“कोणत्याही हेतूशिवाय जर तुम्ही राजकारणात येण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी धोका नक्की आहे. आगीत हात टाकाल, तर तुम्ही भाजल्याशिवाय राहणार नाही. मी दीपिकाला वैयक्तिकरित्या ओळखत नाही, म्हणून मला तिची विचारसरणी काय आहे, हे माहित नाही. पण, मला माहिती आहे की, ती एक खूप हुशार आणि बुद्धिमान महिला आहे. जर तिला हे माहित असते की हे ठिकाण राजकीयदृष्ट्या किती संवेदनशील आहे आणि ते तिच्या कारकिर्दीवर कसा परिणाम करू शकते, तर ती तिथे अजिबात गेली नसती.”, असं विवेक अग्निहोत्री मुलाखती दरम्यान म्हणाले.
पावसाच्या सरी बरसणार, प्रेमाचे रंग पसरणार; अतुट प्रेमाची गोष्ट ‘सजना’ चित्रपटातून उलगडणार
मुलाखतीच्या शेवटच्या भागात दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री म्हणाले की, “चित्रपट प्रमोशन दरम्यान बरेच लोकं सेलिब्रिटींना प्रमोशनसाठी युनिक स्ट्रेटेजी देत असतात. काय करावं, कोणाशी बोलावं? हे स्टार्सना लोकं सागंत असतात. पण हे सर्व एका व्यक्तीची चूक होती, त्याला वाटलं की ही एक घटना आहे. पण ती घटना नव्हती. राजकीय विषयात पडल्याने आतापर्यंत अनेक मोठे लोकही अडकले आहेत.” दीपिका पादुकोण शेवटची मेघना गुलजार दिग्दर्शित ‘छपाक’ चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती. ‘छपाक’ चित्रपटात दीपिका पदुकोणने ॲसिड हल्ल्यातील पीडित मालतीची भूमिका साकारली होती. २०२० मध्ये जेएनयू कॅम्पसवरील हल्ल्यानंतर दीपिका आंदोलक विद्यार्थांसोबत जाऊन उभी राहिली होती. त्याच दरम्यान तिचा ‘छपाक’ चित्रपट प्रदर्शित होणार होता.