pridarshan jadhav abhinay berde rohit haldikar starrer all is well marathi movie poster released on social declared released date
‘तीन तिघाडा काम बिघाडा’ ही म्हण खोटी ठरवत तीन मित्रांची धमाल दाखविणारा ‘ऑल इज वेल’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येत्या२७ जूनला सज्ज होणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर कलाकार, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत नुकताच एका दिमाखदार समारंभात प्रकाशित झाला. तीन मित्रांची धमाल केमिस्ट्री ट्रेलर मध्ये दिसून येतेय. त्यासोबत इतर कलाकारांचा मजेशीर अंदाजही पहायला मिळतोय. प्रेक्षकांचं फूल्ल टू मनोरंजन करणारा हा चित्रपट नक्की बघा असं चित्रपटातील कलाकारांनी यावेळी आवर्जून सांगितलं.
पावसाच्या सरी बरसणार, प्रेमाचे रंग पसरणार; अतुट प्रेमाची गोष्ट ‘सजना’ चित्रपटातून उलगडणार
याप्रसंगी बोलताना निर्माते अमोद मुचंडीकर, वाणी हालप्पनवर तसेच सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे, विनायक पट्टणशेट्टी म्हणाले की, काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशाने आम्ही एकत्र आलो. प्रेक्षकांना एन्जॉय करता येईल अशा कथानकाच्या शोधात असताना लेखक प्रियदर्शन जाधव, दिग्दर्शक योगेश जाधव आणि कार्यकारी निर्माते संजय ठुबे यांच्या सहकार्याने हा धमाल विषय आम्ही आणला आहे. सहकुटुंब अनुभवायला मिळणारी हास्याची मेजवानी असून ‘ऑल इज वेल’ हा चित्रपट मनोरंजनाची अफलातून ट्रीट असणार आहे असा विश्वास सर्व निर्मात्यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी बोलताना दिग्दर्शक योगेश जाधव म्हणाले की, ‘एवढ्या कलाकारांसह एका वेगळ्या विषयाचा चित्रपट करता आला याचा खूप आनंद आहे. निखळ हास्याची मेजवानी देणारा हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘ऑल इज वेल’ या चित्रपटाचं काही दिवसांपूर्वीच एक मजेदार पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या पोस्टरवरून चित्रपटाविषयी उत्सुकता अधिकच वाढली होती. त्यातच आता चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर, सयाजी शिंदे, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, माधव वझे, अजय जाधव, अमायरा गोस्वामी, दिशा काटकर या अशा कलाकारांची जमून आलेली उत्तम भट्टी काहीतरी धमाल घडवणार हे दाखवतोय. प्रत्येक कलाकाराच्या सळसळत्या ऊर्जेचं दर्शन चित्रपटातून दिसणार आहे. ‘ऑल इज वेल’ चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव तर लेखन प्रियदर्शन जाधव यांनी केले आहे. या चित्रपटाचे निर्माते अमोद मुचंडीकर, वाणी हालप्पनवर आहेत. सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे, विनायक पट्टणशेट्टी आहेत.
‘ऑल इज वेल’ चित्रपटाचे कार्यकारी निर्माते संजय ठुबे आहेत. संगीत चिनार-महेश,अर्जुन जन्या यांचे आहे. छायांकन मयुरेश जोशी तर संकलन अथश्री ठुबे यांचे आहे. नृत्यदिग्दर्शक राजेश बिडवे तर साहसदृश्ये अजय ठाकूर पठाणीया यांची आहेत. वेशभूषा किर्ती जंगम तर रंगभूषा अतुल शिधये यांनी केली आहे. गीतकार मंदार चोळकर आहेत. गायक रोहित राऊत, गायिका अपेक्षा दांडेकर यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. कलादिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे.






