फोटो सौजन्य - social media
दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन सध्या चर्चेत आला आहे. ‘पुष्पा २’ चित्रपटामुळे चर्चेत राहिलेल्या अल्लू अर्जुनला त्याच्या हैदराबाद येथील घरातून अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर अभिनेता चर्चेत आला आहे. ‘पुष्पा २’च्या प्रिमियरवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला असून एक लहान मुलगा गंभीर जखमी आहे, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अभिनेत्याला आज अटक झाली आहे. अभिनेत्याच्या अटकेवर पहिलीच बॉलिवूडमधून प्रतिक्रिया आली आहे. ‘बेबी जॉन’ फेम अभिनेता वरुण धवनने प्रतिक्रिया दिली आहे.
अल्लू अर्जुनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, नामपल्ली कोर्टाने दिला मोठा आदेश!
प्रीमियरवेळी ४ डिसेंबर रोजी अल्लू अर्जुन हैद्राबादमधल्या संध्या थिएटरमधून बाहेर पडल्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला असून त्या महिलेचा मुलगा गंभीर जखमी झाला. मृत महिलेचे पती मोगदमपल्ली भास्कर यांनी ‘ईटाईम्स’शी बोलताना आपल्या पत्नीच्या मृत्यूचे कारण अल्लू अर्जुनला जबाबदार धरले आहे. थिएटरमध्ये घडलेल्या घटनेनंतर मृत महिलेच्या कुटुंबीयांनी चिक्कडपल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. भारतीय न्याय संहिता अधिनियमाच्या कलम 3(5) सह कलम 105 आणि 118(1) नुसार अभिनेता अल्लू अर्जुनसह त्याच्या सिक्युरिटी एजन्सीवर आणि थिएटर प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अल्लू अर्जुनच्या अटकेतील मृत महिलेच्या पतीचा यू-टर्न, केस घेणार मागे
हैदराबादमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनने मृत महिलेच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची मदत करण्याचे जाहीर केले होते. मात्र आज अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केली आहे. अल्लू अर्जुनच्या अटकेची घटना कळताच वरुण धवन म्हणाला, “जी घटना घडली ती खूप दुर्दैवी आहे. त्याबद्दल मी शोक व्यक्त करतो. पण त्याचवेळी या घटनेचा दोष फक्त एका व्यक्तीला देऊ शकत नाही.” दरम्यान, अल्लू अर्जुनला अटक करून पोलिसांनी चिक्कडपल्ली पोलिस स्थानकात नेलं आहे. महिलेच्या मृत्यूची नोंद याच पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.