"'छावा' सब पर भारी है..." आठव्या दिवशी गाजवलं बॉक्स ऑफिस; कमाईच्या बाबतीत अक्षय आणि अजयलाही मागे टाकले
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट रिलीज होऊन एक आठवडा झाला आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असलेला हा ऐतिहासिक चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त रेकॉर्ड ब्रेक कमाई करताना दिसत आहे. १४ फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये रिलीज झालेल्या ह्या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये क्रेझ काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘छावा’ चित्रपट सध्या प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी धमाकेदार कमाई केली आहे. चला तर जाणून घेऊया, चित्रपटाच्या आठव्या दिवसाच्या कमाईबद्दल
फराह खानच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊकडून तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय ?
प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीच कमाईच्या बाबतीत मोठी डरकाळी फोडली आहे. चित्रपटाने मोजून ८ दिवसांतच २५० कोटींच्या आसपास कमाई करत सर्वांचेच लक्ष वेधले आहे. चित्रपटाने पहिल्या आठवड्यामध्ये, २२५. २८ कोटींची कमाई केलेली आहे. तर रिलीजच्या आठव्या दिवशी चित्रपटाने २४. ०३ कोटींची कमाई केलेली आहे. चित्रपटाने एका आठवड्यामध्ये एकूण २४९. ३१ कोटींची कमाई केलेली आहे. तर, जगभरात ‘छावा’ चित्रपटाने ३१० कोटींपेक्षा अधिकची कमाई केलेली आहे. चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच २० कोटींपेक्षा अधिकची कमाई करत आहे. चित्रपटाची कमाई पाहाता येत्या काळात हा चित्रपट नवीन प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांनाही टक्कर देईल, हे नक्की.
विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘छावा’ चित्रपटाने आपल्या आठ दिवसांच्या कमाईमध्ये, ‘जवान’, ‘पठान’, ‘पुष्पा’ यांसारख्या चित्रपटांनाही कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. ‘छावा’ चित्रपटाने प्रदर्शनानंतर ७ चित्रपटांना टक्कर दिली आहे. त्यात कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’, जुनैद खानचा ‘लवयापा’, हिमेश रेशमियाचा ‘बॅडएस रविकुमार’, अजय देवगणचा ‘आझाद’, अक्षय कुमारचा ‘स्कायफोर्स’ आणि शाहिद कपूरच्या ‘देवा’ चित्रपटाला टक्कर दिली आहे. या सातही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर म्हणावी तितकी कमाई केलेली नाही. हे सातही चित्रपट २५० पर्यंत देखील पोहोचू शकले नाहीत.
१३० कोटींचा बजेट असलेल्या ‘छावा’चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे, तर अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. संतोष जुवेकरने रायाजी हे पात्र साकारले आहे, तर विनित सिंह कवी कलश या भूमिकेत आहे. सुव्रत जोशी, निलकांती पाटेकर, शुभांकर एकबोटे, आशुतोष राणा, सारंग साठ्ये, दिव्या दत्ता, नील भूपालम, प्रदीप राम सिंह रावत, डाएना पेंटी हे कलाकारही या चित्रपटात आहेत.